अखेर "त्या' पोलिसाविरुद्ध गुन्हा 

अखेर "त्या' पोलिसाविरुद्ध गुन्हा 

लॅम रोड - माळवे मायलेकींच्या अपघात प्रकरणातील संशयित पोलिसाला अपघातग्रस्त मुलीने ओळखल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर त्याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आले. 

पोलिस हिट ऍन्ड रन प्रकरणी "सकाळ'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानंतर शनिवारी सकाळी आडगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक एच. एन. देवरे सहकाऱ्यांसह अपघातग्रस्त हर्षदा आणि तिची आई उपचार घेत असलेल्या नाशिक रोड येथील रुग्णालयात संशयित पोलिस कर्मचाऱ्यासह दोघांना घेऊन गेले. दोन संशयितांपैकी तिने आडगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या सुनील तुकाराम पाचारणे याला ओळखले. हर्षदाने मोठ्या हिमतीने कुठल्याही दबावाला बळी न पडता हाच तो पोलिस, असे सांगितल्यानंतर त्या संशयिताचा चेहरा पडला होता. 

पोलिस असल्याचा तोरा उतरला 
अपघात झाल्यापासून संशयित पोलिस "तो मी नव्हेच' या आविर्भावात वावरत होता. मी पोलिस आहे; माझे कोण काय करेल, या तोऱ्यात तो वावरत होता. जखमी हर्षदा व तिच्या आईचा खर्च करणार नाही, असे या कुटुंबाला ठणकावून सांगत असल्याने त्यांच्यावर आभाळ कोसळले होते. एकीकडे रुग्णायातील उपचारासाठी कुटुंबीयांची होणारी परवड, तर दुसरीकडे पोलिसांकडून केली जाणारी टाळाटाळ यामुळे कुटुंब व त्यांचे नातेवाईक चिंताग्रस्त होते. "सकाळ'ने या घटनेचा पाठपुरावा केल्यानंतर संशयित पोलिसाला पहिल्यापासून पाठीशी घालणाऱ्या आडगाव पोलिसांना अखेर संशयित सुनील पाचरणेविरुद्ध गुन्हा दाखल करावा लागला. 

पोलिस प्रशासन काय कारवाई करणार? 

संशयित पोलिसाला न्यायालयात हजर केले असता, त्याला जामिनावर सोडले आहे. मात्र, राष्ट्रीय खेळाडूला जायबंदी केल्याने पोलिस प्रशासन त्याच्यावर खातेनिहाय काय कारवाई करते, याकडे लक्ष आहे. 

पोलिसभावाच्या उलट्या बोंबा 
दरम्यान, आज सकाळी पोलिस संशयिताला घेऊन आल्यानंतर सुरवातीला संशयिताच्या भावाने ही मुलगीच आम्हाला येऊन धडकली, असे सांगत दबाव आणत असल्याचे माळवे कुटुंबीयांनी सांगितले. त्या अवस्थेत हर्षदाने दबावाला न जुमानता संशयित कसा चुकीच्या पद्धतीने आमच्या दुचाकीला येऊन धडकला, याचे कथन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com