आश्रमशाळेतील शिक्षकांच्या वेतनासंदर्भात उद्या सुनावणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

नाशिक - अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांच्या रखडलेल्या वेतनासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवर शुक्रवारी (ता. 4) सुनावणी होणार आहे.

नाशिक - अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांच्या रखडलेल्या वेतनासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवर शुक्रवारी (ता. 4) सुनावणी होणार आहे.

राज्यात 1999 ते 2005 या दरम्यान अनुदानित आश्रमशाळेमध्ये झालेली शिक्षकभरती नियमबाह्य झाली असल्याच्या कारणातून राज्यातील सुमारे एक हजार 433 हून अधिक शिक्षकांचे वेतन शासनाकडून रोखण्यात आले होते. या संदर्भात शिक्षक आणि लोकप्रतिनिधींनी आदिवासी विकास विभागाच्या विरोधात आंदोलन केले होते. या काळात रुजू झालेल्या सर्व शिक्षकांना त्यांचे वेतन तत्काळ अदा करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. नाशिकमधून अनुदानित आश्रमशाळेतील काही शिक्षकांमार्फत मुंबई उच्च न्यायालयात 2006 मध्ये याचिका दाखल करण्यात आली होती.