नाशिकः आदिमायेचे दर्शनासाठी येणाऱ्या वाहनाला अपघात; 26 जखमी

नाशिकः आदिमायेचे दर्शनासाठी येणाऱ्या वाहनाला अपघात; 26 जखमी
नाशिकः आदिमायेचे दर्शनासाठी येणाऱ्या वाहनाला अपघात; 26 जखमी

वणी (नाशिक): सप्तश्रृंगी गडावर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेस आदिमायेचे दर्शनासाठी येणाऱ्या केळी रुम्हणवाडी (ता. अकोले) येथील भाविकांची पिकअप वणी नाशिक रस्त्यावरील ओझरखेड गावाजवळ पलटी होवून १३ महिलांसह २६ भाविक जखमी झाले आहे. जखमीपैकी दोघांना नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. दरम्यान, वणी व सप्तश्रृंगी गडावर यात्रा असूनही येथील ग्रामिण रुग्णालयात एकच महिला डॉक्टर उपस्थित असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

केळी रुम्हणवाडी (ता. अकोले, जि नगर) येथील जय माता दी मंडळाचे दीडशे वर भाविक वेगवेगळ्या वाहानाने सप्तश्रृंगी दर्शनासाठी येत असतांना ओझरखेड जवळ पिकअपचे (गाडी नं.एम एच 15 1987) इंजिन अचानक लॉक झाल्याने पिकअप गाडीने पलटी घेतली. यात पिकअप मध्ये असलेले सर्व २६ भाविकांना मार लागून जखमी झाले. अपघात झाल्यावर परीसरातील रहिवाशी व मार्गावरील वाहन चालकांनी तातडीने जखमींना मदत करीत वणी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.

दरम्यान, येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या चार वैद्यकिय अधिकाऱ्या पैकी महिला डॉ. कोमल चौरे या एकमेव अधिकारी उपस्थित असल्याने ग्रामस्थ व भाविकांनी संताप व्यक्त केला. डॉ. चौरे यांनी आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत घेवून जखमींवर उपचार केले. याबाबत वणी पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वणी-नाशिक रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असून नवरात्रा पूर्वी रस्ता दुरुस्तीची करणे गरजेचे असल्याचे दैनिक सकाळमध्ये बातम्या प्रसिध्द केल्या होत्या. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कालच गडावर झालेल्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना अपघात होवू नये म्हणून खड्डे तातडीने बुजविण्याचा आदेश केला होता. मात्र, याकडे सदर विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत असून, या रस्त्यावर अपघात घडल्यास संबधित अधिकाऱ्याॆवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

जखमींची नावे
अक्षय जगताप २४, संगिता साबळे  १७, काळु साबळे ४०, मच्छींद्र लोखंडे १७, निवृत्ती तळपाये ३०, एकनाथ खतेले ३२  चालक, तारा खतेले २८, लक्ष्मी मेंगाळ ३०, मंगल मेंगाळ ३६, बाळु खेडले १६, गोरक उघडे १३, दिपक दिघळे १४, प्रकाश जाधव १४, भारती तळपाडे ३५, अनिता तळपाडे ३५, शकुबाई कवटे २२, रेश्मा धुळे २३, अश्विनी तळपाडे १८, अंकिता भोईर, वृक्षाली आघाणी २७, सखुबाई भोईर ५५, श्रावणी तळपाडे, गोरख उघडे २३, सुगंधा मेंघाळ, प्रेम तळपाडे ४३, सोनाली जगताप.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com