सप्तश्रृंगी मंदीर परीसरात होणारी बोकड बळीची प्रथा झाली बंद

दिगंबर पाटोळे
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

वणी (नाशिक) : साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तश्रृंगी गडावर दसऱ्याच्या दिवशी सप्तश्रृंगी मंदीर परीसरात होणारी बोकड बळीची प्रथा जिल्हाधिकाऱ्यांनी एैतिहासिक निर्णयानंतर आजपासून (शनिवार)  बंद झाली आहे. दरम्यान, ट्रस्टने आदेशाचे पालन करीत आज मध्यरात्रीच कोहळ्याचा प्रतिकात्मक बळी देवून शतचंडी यागास पूर्णाहूती दिली आहे. तर ग्रामस्थांच्यावतीने पंरपरेनूसार बळी देण्याचे ठिकाण बदलून बंदी नसलेल्या ग्रामपंचायत हद्दीत बोकड बळी देवून शेकडो वर्षांची परंपरा सुरु ठेवली आहे.

सप्तश्रृंगी गडावर मागील वर्षी दसऱ्याच्या दिवशी मंदीर परीसरात बोकड बळी कार्यक्रमादरम्यान न्यासाच्या सुरक्षा रक्षकाकडून गोळी सुटल्यानंतर झालेल्या दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी गडावर मंदीर परीसरात होणारी बोकड बंदीचा निर्णय घेवून प्रशासनास त्याप्रकारचे आदेश दिले होते.

यानंतर गडावरील भाविकांनी शेकडो वर्षाची असलेली परंपरा बंद अचानक खंडीत होणार यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. याबाबत प्रसासनाने आदेश मागे घेण्यासाठी गड, दरेगांव येथील ग्रामस्थांनी प्रसासनास निवेदनही दिले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी आपला आदेश कायम ठेवल्यानंतर मंदीर परीसरात कोणी बोकड बळी देवू नये म्हणून पहिली पायरी ते मंदीर दरम्यान कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ग्रामस्थांनी शुक्रवारपासून (ता. २९) स्वतंत्ररीत्या परंपरा सुरु राहाण्यासाठी गडावरील प्राथमिक शाळेच्या परीसरात नवचंडी याग, होमहवन धार्मिक विधीचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

आज सकाळी यागास पूर्णाहूती कार्यक्रमा दरम्यान पंरपंरेनूसार शिवालय तलाव पासून बोकडाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मो्ठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. मिरवणूक प्रसासनाच्या आदेशानूसार पहिल्या पायरीनंतर न नेता शाळा परीसरात नेवून सांगता करण्यात येवून शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थित बोकड बळी देण्यात आला. दरम्यान, ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आदेशानूसार देवस्थानची हद्द सोडूनच ग्रामपंचायत क्षेत्रात होमहवन व बोकड बळी कार्यक्रम करुन आदेशाचे पालन केल्याचे सांगितले आहे.