सातपूर, अंबडच्या गुन्ह्यांमध्ये  परप्रांतीयांची संख्या अधिक

सतीश निकुंभ
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

सातपूर - सातपूर, अंबड परिसरातील गुन्ह्यांची पडताळणी केली असता चोरी, दरोडा, घरफोडी व अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार, तसेच महिलांची छेडछाड या प्रकरणात स्थानिक मुलांना हाताशी धरून परप्रांतीय गुन्हेगारांचा सहभाग वाढला आहे. त्यात बहुतांश कारखान्यांतही परप्रांतीय सुरक्षारक्षक नेमणूक ही मोठी चिंताजनक बाब असल्याचे मत पोलिस सूत्रांनी व्यक्त केले आहे.

सातपूर, अंबड या औद्योगिक क्षेत्राला लागून असलेल्या कामगार व गावठाण लोकवस्तीत स्थानिकांबरोबर मळे परिसर, श्रमिकनगर, राधाकृष्णनगर, सातपूर, अंबड लिंक रोडरील भंगार बाजार, केवल पार्क, डीजीपीनगर, शांतीनगर झोपडपट्टी, दत्तनगर, संजीवनगर, चुंचाळे गावठाण परिसर, एबीबी कंपनीच्या पाठीमागे, सातपूर राजवाड्याशेजारील गायकवाडनगर, स्वारबाबानगर, कांबळेवाडी, संतोषीमाता झोपडपट्टी यासह विविध भागांत राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारमधील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे त्यांचे नातेवाईक नोकरीनिमित्त या भागात ये-जा करतात. नोकरीत अपयश आल्यानंतर हेच लोक चोरी, दरोड्यांमध्ये गुंततात, असा पोलिसांचा प्राथमिक अहवाल आहे. गुन्हे करून मिळेल त्या रेल्वेने अथवा खासगी वाहनाने रातोरात फरारी होतात. त्यांना फरारी होण्यासाठी काही स्थानिक नेतेही पुढे असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे व सहाय्यक आयुक्त सचिन गोरे यांनी गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्यांना आवर घालण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

गुन्हे करून गावाकडे पलायन
गावाकडील माहिती त्वरित उपलब्ध होऊ न शकल्याने पोलिसांच्या तपासातही अनेक अडथळे निर्माण केले जातात. दीड वर्षापूर्वी सातपूर-अंबड लिंक रोडवरील एका फर्निचरच्या गुदामात मंगल मांजी या तरुणाचा खून झाला होता. त्याचा मारेकरी अजूनही फरारी असून, खून करून तो गावाकडे पळाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या आरोपीला फरारी करण्यामागे काही स्थानिकच पुढे होते.

Web Title: nashik news satpur ambad crime