शिवसेना नगरसेवकांची शेतकरी कुटुंबीयांना मदत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

नाशिक -  काही वर्षांत राज्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले होते. त्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय घेतला. आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे नगरसेवकांचे एक महिन्याचे दोन लाख 62 हजार 500 रुपये मानधन "मातोश्री'वर सुपूर्त करण्यात आले. 35 नगरसेवकांनी मानधन दिले. शिवसेनेने यापूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर जनआंदोलन केले होते. नाशिकमधून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर चर्चा घडवून आणण्यासाठी मेळावे घेण्यात आले होते. त्या वेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे धोरण जाहीर झाले होते.

नाशिक -  काही वर्षांत राज्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले होते. त्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय घेतला. आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे नगरसेवकांचे एक महिन्याचे दोन लाख 62 हजार 500 रुपये मानधन "मातोश्री'वर सुपूर्त करण्यात आले. 35 नगरसेवकांनी मानधन दिले. शिवसेनेने यापूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर जनआंदोलन केले होते. नाशिकमधून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर चर्चा घडवून आणण्यासाठी मेळावे घेण्यात आले होते. त्या वेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे धोरण जाहीर झाले होते. संपर्क नेते आमदार अजय चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे आदी उपस्थित होते.