छोट्या कल्पनेतून उद्योगविश्‍वाचा वेध घेणार

दत्ता ठोंबरे
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

कोणतीही कल्पना ही छोटी नसते. छोट्या कल्पनेतून मोठे उद्योगविश्‍व निर्माण करता येऊ शकते. आपल्याकडील कल्पनाही आपण सत्यात उतरून मोठा उद्योग उभारू शकतो, अशा विश्‍वास ‘सिमॅसिस-यिन लीडरशिप डेव्हलपमेंट’ या उपक्रमादरम्यान भुजबळ नॉलेज सिटीच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

कोणतीही कल्पना ही छोटी नसते. छोट्या कल्पनेतून मोठे उद्योगविश्‍व निर्माण करता येऊ शकते. आपल्याकडील कल्पनाही आपण सत्यात उतरून मोठा उद्योग उभारू शकतो, अशा विश्‍वास ‘सिमॅसिस-यिन लीडरशिप डेव्हलपमेंट’ या उपक्रमादरम्यान भुजबळ नॉलेज सिटीच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटी, एमईटीमध्ये ‘सिमॅसिस- यिन लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम’चे भव्य अनावरण आज करण्यात आले. या वेळी औषधनिर्माणशास्त्र, पॉलिटेक्‍निक, अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. एमईटीच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय क्षीरसागर, प्रा. डॉ. दीपक भांबिरे, प्रा. रोहन अहिरे, ‘यिन’चे श्‍यामसुंदर माडेवार, ‘सकाळ’चे जाहिरात व्यवस्थापक सुनील पाटील आदी उपस्थित होते. 

प्राचार्य क्षीरसागर म्हणाले, की ‘सकाळ’ माध्यम समूहाने ही खूप चांगली संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरवर फोकस करणारा हा उपक्रम असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा निश्‍चितच फायदा होईल. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकासासाठी या उपक्रमाचा लाभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’चे कुणाल क्षीरसागर यांनी ‘सिमॅसिस- यिन लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम’विषयी उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. कोणतीही कल्पना ही छोटी नसते. आपल्याकडे आता सर्व गोष्टी उपलब्ध झाल्या आहेत. सर्व रिसोर्सेस असताना आपण वेगळ्या कल्पना लढवल्या तर आपल्याला यश निश्‍चित मिळणार आहे. उद्योग उभा करताना सुरवात कशी करायची, सूक्ष्म नियोजन, भांडवल उभारणी, मार्केटिंग यांसारख्या उद्योगाबाबतच्या सर्व घटकांची त्यांनी बारीकसारीक माहिती दिली. या वेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे त्यांनी निरसन केले. अमृता हेगडे यांनी सूत्रसंचालन केले. ‘यिन’ प्रतिनिधी पीयूष इंगळे यांनी आभार मानले.