आम्‍ही घडूच, शिवाय समाजात परिवर्तनही घडवू...

अण मलाणी
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

इतरांपेक्षा वेगळे करून दाखविण्याच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी दमदार मार्गदर्शनाचीही आवश्‍यकता असते. आपल्यातील क्षमतांना वाव देण्यासाठी सिमॅसिस-यिन लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम लाभदायी ठरू शकतो, असा विश्‍वास संदीप विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी व्यक्‍त केला. नेतृत्वविकासाच्या स्वप्नपूर्तीसाठी या उपक्रमात सहभागी होणार असल्याची ग्वाही विद्यार्थ्यांनी दिली.

संदीप विद्यापीठात सिमॅसिस-यिन लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आज भव्य उद्‌घाटन करण्यात आले. या उपक्रमाची माहिती जाणून घेण्यासाठी संस्थेच्या पॉलिटेक्‍निक, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. या वेळी संदीप पॉलिटेक्‍निकचे प्राचार्य प्रशांत पाटील, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल जाधव, संदीप इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्‍निकचे प्राचार्य एस. डी. पवार आदी उपस्थित होते. 

प्राचार्य प्रशांत पाटील म्हणाले, की डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्यापासून ‘सकाळ’च्या माध्यमातून उद्योजकतावाढीसाठी प्रयत्न झालेले आहेत. ही परंपरा जोपासत आजही उद्योजकता विकासासाठी अनोखा उपक्रम राबविला जाणे, ही स्तुत्य संकल्पना आहे. विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा नक्‍कीच लाभ होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. दरम्यान, कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्सुकतेत या उपक्रमाविषयीची माहिती जाणून घेतली. सोबतच शंकांचे समाधानही करून घेतले. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांनी कौशल्यविकासाचे आजच्या काळातील महत्त्व सांगताना उद्योजकता, व्यावसायिकतेत तरुणाईला उपलब्ध संधींविषयीची माहिती दिली. 

‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’चे मुख्य व्यवस्थापक तेजस गुजराथी यांनी सिमॅसिस-यिन लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामविषयीची सखोल माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. प्रा. आर. एन. बोंडे यांनी सूत्रसंचालन केले. मेकॅनिकल विभागाचे प्रमुख प्रा. ए. डी. मोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. यू. एन. अभोणकर यांनी केले.

Web Title: nashik news simaces-yin leadership development program