नागपूरच्या धर्तीवर नाशिकमध्ये स्मार्ट ॲन्ड सेफ सिटी प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

नाशिक - राज्य शासनाच्या माहिती, जनसंपर्क व तंत्रज्ञान विभाग आणि नाशिक म्युनिसिपल स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.तर्फे नाशिकमध्ये नागपूरच्या धर्तीवर स्मार्ट ॲन्ड सेफ सिटी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाला याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केला जाणार आहे. त्यातून आर्थिक तरतूद उपलब्ध करून दिली जाईल.

राज्याचे माहिती, जनसंपर्क व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम आज नाशिकमध्ये आले होते. स्मार्टसिटीच्या अनुषंगाने माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित सर्व विषयांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणून सेवा पुरविण्याचा उद्देश यामागे आहे. त्यासाठी ऑप्टिकल फायबरचे जाळे शहरात विणले जाणार असून, त्याच ऑप्टिकल फायबरच्या माध्यमातून तंत्रज्ञानाशी संबंधित सुविधा पुरविल्या जाणार आहेत. नागपूरमध्ये स्मार्ट ॲन्ड सेफ्टी प्रकल्प पूर्ण झाला आहे. त्याच धर्तीवर हा प्रकल्प नाशिकमध्ये होईल. 

स्मार्टसिटीमध्ये महापालिकेकडून शंभर कोटींची गुंतवणूक झाली आहे. स्मार्टसिटीतील स्मार्ट वाहतूक, स्मार्ट ई-सर्व्हिसेस, स्मार्ट पार्किंग आदी सुविधा स्मार्ट ॲन्ड सेफ सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून राबविल्या जाणार आहेत. शहर पोलिस आयुक्तालयाकडून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव राज्याच्या गृहविभागाला सादर केला आहे. त्या प्रकल्पाचा विकास या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी राज्य शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या चार अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा व शहर अभियंता यू. बी. पवार यांच्याशी श्री. गौतम यांची भेट झाली.