राकेश मोरे यांनी पकडला जहाल विषारी घोणस 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

नाशिक - भारतीय उपमहाद्वीपात अत्यंत विषारी समजला जाणारा घोणस जातीचा साप चेतनानगर येथील कृष्णकुंज अपार्टमेंट येथे सर्पमित्र राकेश मोरे यांनी आज पकडला. त्यांना सापांचे अभ्यासक मनीष गोडबोले यांचे मार्गदर्शन लाभले. या सापाचे विष रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम करते. दंशानंतर ज्या जागी साप चावतो, तो भाग सुजतो. रक्तवाहिन्या सुजून नाकातोंडातून रक्त येऊ लागते. भारतीय उपमहाद्वीपामध्ये सर्वाधिक मृत्यू या सापामुळे होतात. याच्या हल्ल्याचा वेग एका सेकंदात दोन फुटांपर्यंत आहे, अशी माहिती श्री. मोरे यांनी या वेळी दिली. 

टॅग्स