ध्वनिप्रदूषणात वाढ, शुद्ध पाण्यातही घट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

नाशिक - महापालिकेच्या पर्यावरण विभागाने सादर केलेल्या २०१६ च्या पर्यावरण अहवालामध्ये शहरात ध्वनिप्रदूषणात वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. हवेचा दर्जाही सर्वसाधारण असल्याचे सांगितले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत शुद्ध पाण्याचे प्रमाणही कमी दर्शविले आहे. 

महापालिकेच्या आरोग्य व पर्यावरण विभागातर्फे दर वर्षी पर्यावरण मापन अहवाल सादर केला जातो. या वर्षी २०१६ चा अहवाल आज महासभेवर सादर करण्यात आला. त्यात हवाप्रदूषणाचा सर्वसाधारण दर्जा असल्याचे नमूद करण्यात आले. राजीव गांधी भवन येथे हवा गुणवत्ता निर्देशांक ४५.० आहे.

व्हीआयपी कंपनीजवळ ४५.५० निर्देशांक आहे. गोल्फ क्‍लबजवळील आर.टी.ओ. कॉलनी येथे ४०.५०, तर सातपूरच्या उद्योग भवन येथे ३६.९२ हवा गुणवत्ता निर्देशांक दर्शविला आहे. ध्वनिप्रदूषणाच्या बाबतीत वाढ झाली आहे. निवासी क्षेत्रात ५५ डेसिबल आवाज बंधनकारक असताना दिवसा ८७, तर रात्री ७० डेसिबलपर्यंत ध्वनीचे प्रमाण गेले आहे. बाजारपेठेत दिवसा ७७, तर रात्री ६९ डेसिबलपर्यंत प्रमाण गेले आहे. तुलनेने हे प्रमाण अधिक आहे. पाणी शुद्धतेत घट झाली आहे. २०१५ मध्ये १७ हजार ८८२ पाणी नमुने तपासले व त्यात १७  हजार ५१३  पाणी नमुने (९७.९४ टक्के) पिण्याच्या लायक होते. २०१६ मध्ये दहा हजार १५८ पाण्याच्या नमुन्यांपैकी नऊ हजार ९८७ इतके पाणी (९७.३१ टक्के) नमुने पिण्यायोग्य होते. प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूकव्यवस्था बळकट करणे, वृक्षारोपण करणे, सिग्नलवर प्रदूषण कमी करणारी यंत्रणा बसविणे, धार्मिक व लग्नसमारंभात डीजे व इतर वाद्य वाजविण्यावर मर्यादा आणणे, सांडपाणी नदीत मिसळू न देणे आदी उपाय सुचविण्यात आले आहेत.

उत्तर महाराष्ट्र

नाशिक - पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर ठाणे अंमलदाराकडून तक्रार दाखल करून घेतली जाईलच याची खात्री नसते....

01.27 AM

भुसावळ : येथील बांधकाम व्यवसायिक म्हणून परिचित असलेल्या सानिया कादरी यांच्या घरावर एैनपूर येथील संतप्त शेतकऱ्यांनी आज (...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील आरोग्य केंद्रात रुग्णांसह ग्रामस्थांना अजूनही पुरेशा...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017