नामवंत शाळांमध्ये शंभर टक्क्यांची परंपरा कायम

नामवंत शाळांमध्ये शंभर टक्क्यांची परंपरा कायम

नाशिक - शहरातील शाळांमध्ये दहावीच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली. गेल्या वर्षीच्या निकालात यंदा दोन टक्‍क्‍यांनी घसरण झाली. ८८ हजार १२६ पैकी ७९ हजार ९२२ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. हे प्रमाण ९०.६९ टक्के आहे. एक लाख १४ हजार ३५२ मुलांपैकी ९७ हजार ७७१ मुले उत्तीर्ण झाली असून, हे प्रमाण ८५.५० टक्के आहे. दहावीचा आज ऑनलाइन निकाल जाहीर झाला. 

‘न्यू इरा इंग्लिश’चा शंभर टक्के निकाल
नाशिक - न्यू इरा इंग्लिश स्कूलने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत यंदाही स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. अक्षया गिते हिने ९९.४० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थी ः साहिल संदीप देव (९८)- द्वितीय, आदित्य देवीदास जाधव (९६.८०)- तृतीय. एकूण ५३ विद्यार्थ्यांना ९० टक्के, तर ९१ विद्यार्थ्यांना ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळाले. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

होरायझन ॲकॅडमीतून आकांक्षा काळे प्रथम
मविप्र संचलित होरायझन ॲकॅडमी या इंग्रजी माध्यम शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून, आकांक्षा काळे ९६.८० टक्के मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. मृणाल कस्तुरे हिने ९६.२० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. विद्यालयातील ८० विद्यार्थ्यांपैकी ६३ उत्कृष्ट श्रेणीत, तर १७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. इंग्रजीत आकांक्षा काळे, प्रसाद राठोड व भूषण राजपूत यांना १०० पैकी ८८ गुण, तर हिंदी विषयात तनिका मोहोड हिला १०० पैकी ९५ गुण, मराठीमध्ये आकांक्षा काळे, मृणाल कस्तुरे, गणेश आव्हाड, भूषण राजपूत व अदिती थेटे यांना १०० पैकी १०० गुण मिळाले. विज्ञानमध्ये मृणाल कस्तुरे व अदिती थेटे यांना १०० पैकी १००, समाजशास्त्रामध्ये तनिका मोहोडने १०० पैकी ९८ गुण मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार, अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे, सभापती ॲड. नितीन ठाकरे, उपसभापती नानाजी दळवी, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, संचालक मंडळ, शिक्षणाधिकारी सी. डी. शिंदे, मुख्याध्यापिका कुमुदिनी बंगेरा यांनी अभिनंदन केले.

‘नॅब’च्या निवासी शाळेचा शंभर टक्के निकाल
‘नॅब’च्या निवासी शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून, परीक्षेसाठी प्रविष्ट असलेल्या सात मुलींमधील कल्पना घोडेरावने ७६ टक्के मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. ग्रामीण भागातील आणि अंध असलेल्या या मुलींनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. आरती कुलथे (६९.२० टक्के), दीपाली यादव (६९.६०), विनिता वड (६८.३०), योगिता सायटे (७३), सोनाली घुगे (७४), सोनी मुराडे (७५.२०) यशस्वी झाल्या. संस्थेचे अध्यक्ष रामेश्‍वर कलंत्री, शाळेच्या अध्यक्षा मंगला कलंत्री यांनी या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. 

के. जे. मेहता हायस्कूलचे  चारही अंध विद्यार्थी प्रथम श्रेणीत
के. जे. मेहता हायस्कूल, ई. वाय. फडोळ ज्युनिअर कॉलेजच्या अंध विभागातील चार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ते चारही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. आदित्य मुळे (६८.४ टक्के), गितेश बुराडे (६६.६), संदीप भडांगे (६४.६), अभिजित राऊत (६४) उत्तीर्ण झाले. त्यांच्या यशाबद्दल साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक रोडचे अध्यक्ष गणपतराव मुठाळ, सचिव प्रवीण दोशी, खजिनदार मिलिंद पांडे, शाळेच्या प्राचार्या करुणा आव्हाड, अंध युनिटप्रमुख निकिता पांडे, शिक्षक राजाराम गायकवाड, पुंडलिक आवळे यांनी अभिनंदन केले. शाळेचे शिक्षक मुकेश बाविस्कर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनीही या विद्यार्थ्यांना घडविण्यात मोलाचे योगदान दिले.

जनता सेवा मंडळ संस्था
जनता सेवा मंडळ संचलित विविध शाळांनी घवघवीत यश मिळविले आहे. पिंपळपाडा येथील विद्यालयाचा निकाल ९८.८८ टक्‍के, कुळवंडी शाळेचा ९८.५९, धामणगाव शाळेचा ९४.७३, भेंडाळी शाळेचा ९३.९७, खोकरतळे शाळेचा ९३.८७, पंचवटी माध्यमिक विद्यालयाचा ९२.७५, चाचडगाव शाळेचा ८३.११, धामणगाव आश्रमशाळेचा ८२.०५, नवचेतना विद्यालयाचा निकाल ७२.२२ टक्‍के लागला. संस्थाध्यक्ष गं. पां. माने, प्रशासनाधिकारी पी. पी. संदांशी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

होली मदर स्कूलमध्ये राहुल गुप्ता प्रथम
होली मदर स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. राहुल गुप्ता ८८.८ टक्के गुण मिळवून प्रथम, तर गौतम शिंगारे  (८३.४०) द्वितीय, शिवम पांडे (८२.२०) तृतीय आला. मुलींमध्ये कावेरी धोंगडे ८३.२० टक्के मिळवून प्रथम आली. संस्थेच्या अध्यक्षा हिरा प्रिटिकीन, अभय मदनकर व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले.

चौहान विद्यालयाचा ९४ टक्के निकाल
सिडको - येथील श्रीमान टी. जे. चौहान विद्यालयाचा निकाल ९४.११ टक्के लागला. गौरी झोपे (९४.६०) प्रथम, ऋतुजा थोरात (९३.६०) द्वितीय आणि चेतना महाजन (९३.४०) तृतीय आली. स्वामी विवेकानंद सोसायटीचे अध्यक्ष वंदन पोतनीस, उपाध्यक्ष जयसिंह पवार, सचिव सुभाष पवार, रत्नाकर वेळीस, साहेबराव आहिरे, मुख्याध्यापिका श्रीमती दळे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

के. के. वाघची परंपरा कायम
के. के. वाघ सेकंडरी स्कूल व ज्युनिअर कॉलेज पुरिया पार्क या विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. शाळेचा कौशिक ढिकले ९३ टक्के मिळवून प्रथम आला. प्रांजली लाडे (८९.२०), तर विपुल भागवत आणि अनिकेत पवार (८५.२०) यशस्वी झाले. या सगळ्याच विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, सचिव के. एस. बंदी, समन्वयक डॉ. भूषण कर्डिले, प्राचार्या चित्र नरवाडे व शिक्षकांनी अभिनंदन केले.

ब्रह्मा व्हॅली पब्लिक स्कूल
अंजनेरी येथील ब्रह्मा व्हॅली पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्‍के लागला. पूर्वी लढ्ढा (९१.४० टक्‍के) प्रथम, प्रियंका साबळे (८९.६०) द्वितीय, तर प्रथमेश लढ्ढा (८८.६०) तृतीय आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, मुख्याध्यापक चंद्रकांत शिरसाठ, संचालिका गुंजन सिंग, प्रा. निखाडे आदींनी अभिनंदन केले. त्र्यंबकेश्‍वरच्या नगराध्यक्षा विजया लढ्ढा यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

किशोर सुधारालयाचा शंभर टक्के निकाल
किशोर सुधारालय, नाशिक या संस्थेतील तीन मुले दहावीच्या परीक्षेस बसले होते. ते चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले. संस्थेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. संस्थेतील एक किशोर चांगल्या गुणांनी पत्रकारिता प्रथम वर्ष उत्तीर्ण झाला आहे. त्याचा नुकताच कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेतील चार किशोरांनी नुकतीच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून प्रथम वर्ष बी.ए.ची परीक्षा दिली. सर्व किशोरांना संस्थेचे शिक्षक, हाउस मास्टर्स, संस्थेचे प्राचार्य एस. एस. भुसारे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे प्राचार्य, शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले.

यशोदीप शिंदेला ९९.२० टक्के
सिडको : न्यू मराठा (वाघ गुरुजी विद्यालय) हायस्कूलचा विद्यार्थी यशोदीप शिंदे याने दहावीच्या परीक्षेत ९९.२० टक्के गुण मिळवून यश मिळविले. यशोदीपला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे. यशोदीप हा शिष्यवृत्ती परीक्षेतही गुणवत्ता यादीत आला होता. त्याचे वडील रवींद्र शिंदे दिव्याचा पाडा (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. आई-वडिलांचे मार्गदर्शन, तसेच स्वयंम क्‍लासेसचे श्री. गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनामुळेच हे यश मिळाले, असे यशोदीपने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com