स्ट्रक्‍चरल सल्लागार कंपनी नियुक्तीचा स्थायीसमोर प्रस्ताव 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

नाशिक - महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असले, तरी सल्लागार कंपन्या नियुक्त करून त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांची उधळण करण्याचे प्रकार सुरूच आहेत. विविध प्रयोजनासाठी प्रशासनाने दहापेक्षा अधिक सल्लागार कंपन्या नियुक्त केल्या आहेत. आता पुन्हा एकदा स्ट्रक्‍चरल सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीवर ठेवला. 

महापालिकेत एखादी योजना अमलात आणायची झाल्यास त्याबाबतचा सविस्तर अहवाल तयार पाहिजे. या हेतूने काही महिन्यांत सल्लागार कंपन्या नियुक्त केल्या जात आहेत. स्मार्टसिटीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार कंपनी, मालमत्ता सर्वेक्षण, स्वच्छता अभियानासाठी, पाण्याची गळती मोजण्यासाठी स्कोडा टेक्‍निक्‍स, वृक्षगणना, घरकुल योजना, मालमत्ता सर्वेक्षण, एसटीपी सर्वेक्षण, वाहतूक आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार कंपनी नियुक्त करण्यात आल्या. आता स्ट्रक्‍चरल ऑडिटसाठी सल्लागार कंपनी नियुक्त केली जाणार आहे. महापालिकेचे बांधकामविषयक कामांचे प्राकलन तयार करणे, नकाशे तयार करणे, निविदा, स्ट्रक्‍चरल डिझाइन तयार करण्याचे काम सल्लागार कंपनीकडून केले जाणार आहे. निविदाप्रक्रियेमध्ये पाच सल्लागार कंपन्यांनी सहभाग घेतला होता.