सुजित गुंजाळ हे बॅटन ऑफ ऑनर डायरेक्टर ट्रॉफीचे मानकरी

सटाणा : सुजित गुंजाळ यांचा बॅटन ऑफ ऑनर डायरेक्टर ट्रॉफी देऊन गौरव करताना मध्यप्रदेशचे गृह व वाहतूकमंत्री भूपेंद्रसिंग. समवेत पोलिस अकादमीचे संचालक एस. के. वर्मा व इतर उच्चपदस्थ अधिकारी.
सटाणा : सुजित गुंजाळ यांचा बॅटन ऑफ ऑनर डायरेक्टर ट्रॉफी देऊन गौरव करताना मध्यप्रदेशचे गृह व वाहतूकमंत्री भूपेंद्रसिंग. समवेत पोलिस अकादमीचे संचालक एस. के. वर्मा व इतर उच्चपदस्थ अधिकारी.

सटाणा (नाशिक) : येथील सुजित पंढरीनाथ गुंजाळ हे सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) पोलिस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर बॅटन ऑफ ऑनर डायरेक्टर ट्रॉफीचे मानकरी ठरले आहेत. देशात महाराष्ट्राचा एकमेव प्रतिनिधी म्हणून सुजित गुंजाळ यांनी हा बहुमान मिळविल्यामुळे बागलाण तालुक्याचे नाव उंचावले आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे सन २०१५-१६ मध्ये केंद्रीय पोलिस सेवा परीक्षेमार्फत घेण्यात आलेल्या सीमा सुरक्षा दलात सुजित गुंजाळ यांची उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाली होती. ग्वाल्हेर येथे ५२ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ८ नोव्हेंबर २०१७ रोजी भारतातील एकूण ४०८ प्रशिक्षनार्थीना पद व कर्तव्यनिष्ठेची शपथ देण्यात आली. त्यामध्ये गुंजाळ हे देशातून एकमेव महाराष्ट्राचे प्रतिनिधी होते. कायदा, अंतर्गत सुरक्षा, नेतृत्व क्षमता या निकषांवर देण्यात येणाऱ्या बॅटन ऑफ ऑनर डायरेक्टर ट्रॉफी देऊन गुंजाळ यांना गौरविण्यात आले. मध्यप्रदेशचे गृह व वाहतूकमंत्री भूपेंद्रसिंग, पोलिस अकादमीचे संचालक एस.के.वर्मा व इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या हस्ते झालेल्या दीक्षांत समारंभात गुंजाळ यांनी ७ क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारे प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांना गौरविण्यात आले.

विभाग अंतर्गत परीक्षा देऊन केंद्रीय संरक्षण विभागात उच्चपदस्थ अधिकारी होण्याची गुंजाळ यांची इच्छा आहे. दीक्षांत समारंभानंतर सुजित गुंजाळ यांची केंद्र शासनाने काश्मीर फ्रंटीअर मध्ये नुकतीच नियुक्ती केली आहे. सुजित हे नाशिक जिल्हा विधायक कार्य समितीच्या पिंपळणारे (ता. दिंडोरी) येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. टी. गुंजाळ तर येथील जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या उपशिक्षिका यु. टी. जाधव यांचे चिरंजीव आहेत.

ई सकाळवरील इतर ताज्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com