लाचखोर पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव निलंबित

लाचखोर पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव निलंबित

नाशिक - फसवणूक प्रकरणातील पुरवणी दोषारोपपत्रामध्ये आरोपी न करण्यासाठी तक्रारदाराकडून ५० हजारांची लाच स्वीकारणारा पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव यांना निलंबित करण्यात आले. न्यायालयीन कोठडीत असलेल्या जाधव यांच्या जामीन अर्जावर सोमवारी (ता. २७) जिल्हा न्यायालयात सुनावणी होईल. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टाकळी रोड परिसरात शुक्रवारी सापळा रचून लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ अटक केली होती. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी निवांत जाधव यांना पोलिस दलातून निलंबित केले आहे. निलंबन काळात जाधव यांची नियुक्ती नियंत्रण कक्षामध्ये असेल. जाधव यांच्याविरोधात तक्रारी असल्यास त्या दाखल करण्याचे व आयुक्तालय हद्दीमध्ये पोलिसांकडून लाचेची मागणी केली जात असल्यास तत्काळ तक्रार करण्याचे आवाहनही डॉ. सिंगल यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com