स्वाइन फ्लू कक्षात पाच रुग्ण दाखल 

स्वाइन फ्लू कक्षात पाच रुग्ण दाखल 

नाशिक - महिनाभरापासून बंद करण्यात आलेल्या जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षामध्ये सध्या पाच रुग्ण दाखल झाले आहेत. यातील 55 वर्षीय व्यक्तीचा स्वाइन फ्लूचा अहवाल सकारात्मक आला असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

हवामानातील चढ-उतारामुळे स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात आज पाच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. इगतपुरीतील या व्यक्ती अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कक्षात सध्या पेठ तालुक्‍यातील 68 वर्षीय व्यक्तीसह सातपूर आणि चांदोरी येथील दोन महिला, निलगिरी बाग (नाशिक) येथील 60 वर्षीय वृद्ध व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. चौघांचेही स्वॅब पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविले असून, त्यांचा वैद्यकीय अहवाल अद्याप मिळालेला नाही. दरम्यान, वातावरणातील बदलामुळे स्वाइन फ्लूचा धोका वाढल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे. 

नाशिकचा पारा 12 अंशांवर 
गेल्या दोन दिवसांत ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाली होती. मात्र, आज पुन्हा किमान पारा 12.6 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला. त्यामुळे वातावरणात पुन्हा थंडी जाणवू लागली आहे. त्यातच आज दिवसभर वाऱ्याचाही वेग वाढला होता. त्यामुळे बोचऱ्या गार वाऱ्यामुळे थंडी पुन्हा परतली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com