लाचखोर तलाठी नानेगावमध्ये गजाआड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

नाशिक - सातबारावर पीकपेऱ्याची नोंद करण्यासाठी नानेगाव सजाचा तलाठी सुनील अमृत चांडोले याला पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज अटक केली. तक्रारदाराच्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर पीकपेऱ्याची नोंद करावयाची होती.

त्यासाठी 14 नंबरचा फॉर्म भरून नाशिक तहसील कार्यालयास पाठवायचा होता. त्यासाठी तक्रारदाराने नानेगाव सजाचे तलाठी संशयित तलाठी चांडोले याची भेट घेतली असता चांडोले याने दोन हजार रुपयांची मागणी केली. याबाबतची माहिती तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यानंतर नानेगाव तलाठी कार्यालयात सापळा रचत चांडोले यास अटक करण्यात आली.