डॉक्‍टर्स फोरमच्या ‘आरोग्य जागर’चा समारोप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

नाशिक - तनिष्का डॉक्‍टर्स फोरमतर्फे कॉलेज रोडवरील किलबिल स्कूलमध्ये तीन दिवसांचा ‘आरोग्याचा जागर’ हा कार्यक्रम झाला. यादरम्यान या शाळेतील सुमारे २ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

नाशिक - तनिष्का डॉक्‍टर्स फोरमतर्फे कॉलेज रोडवरील किलबिल स्कूलमध्ये तीन दिवसांचा ‘आरोग्याचा जागर’ हा कार्यक्रम झाला. यादरम्यान या शाळेतील सुमारे २ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून नाशिकमधील महिला डॉक्‍टरांनी एकत्र येऊन गेल्या वर्षी ‘तनिष्का डॉक्‍टर्स फोरम’ची स्थापना केली. या फोरमतर्फे ग्रामीण तसेच शहरी भागात विविध वैद्यकीय उपक्रम राबविण्याबरोबरच किशोरवयीन मुलींच्या प्रश्‍नांवरही ‘आरोग्याचा जागर’च्या माध्यामातून व्यापक काम केले जात आहे. तनिष्का डॉक्‍टर्स फोरमच्या गटप्रमुख डॉ. आशालता देवळीकर, त्र्यंबकेश्‍वर तालुका तनिष्का प्रतिनिधी डॉ. साधना पवार, निफाड तालुका तनिष्का प्रतिनिधी डॉ. ज्योती पाटील यांच्यासह डॉ. अनुपमा मराठे, डॉ. प्रतिभा जोशी, डॉ. उज्ज्वला निकम, डॉ. अमृता होळकर, डॉ. माधुरी वारुंगसे, डॉ. शलाका शिंदे, डॉ. वैशाली खरे, डॉ. ज्योती पाटील, डॉ. मंजू व्यवहारे, डॉ. मेघा निर्मळ, डॉ. मेघा कुमावत, डॉ. चैत्राली चौधरी, डॉ. दिव्या बदलानी, डॉ. राजश्री गायकवाड, डॉ. जयश्री कोटकर, डॉ. सुवर्णा गोगटे आदींनी सहभाग घेत विद्यार्थ्यांची तपासणी केली. 

दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी तीन दिवस आरोग्यविषयक मार्गदर्शन व्याख्यानेही झाली. कार्यक्रम यशस्वितेसाठी मुख्याध्यापिका सिस्टर फ्लोरा यांच्यासह कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. 

‘तनिष्का’चे जिल्हा समन्वयक विजयकुमार इंगळे यांनी संयोजन केले.  तनिष्का डॉक्‍टर्स फोरमतर्फे विद्यार्थ्यांसाठी झालेला उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे. ‘सकाळ’ माध्यम समूहाने उपलब्ध करून दिलेल्या या संधीबद्दल आभार.
- सिस्टर फ्लोरा, मुख्याध्यापिका, किलबिल स्कूल, नाशिक

धन्वंतरी पुरस्कार जाहीर
याच शिबिरादरम्यान गटप्रमुख आशालता देवळीकर यांनी तनिष्का डॉक्‍टर्स फोरमच्या माध्यमातून सामाजिक सेवेसाठी दिला जाणारा धन्वंतरी पुरस्कार डॉ. ज्योती पाटील तसेच जयश्री कोटकर यांना दिला जाणार असल्याचे जाहीर केले.