निवडणूक लढवू नये म्हणूनच माझ्यावर खटले - नीलिमाताई पवार

निवडणूक लढवू नये म्हणूनच माझ्यावर खटले - नीलिमाताई पवार

नाशिक - आमदार होण्याची माझी इच्छा नाही. संस्थेतही कामकाज पाहावे, अशी इच्छा नव्हती, पण डॉ. वसंतराव पवार यांच्या दहाव्याच्या दिवशी १८ महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण करून द्या; आम्ही सगळे मिळून सहकार्य करू, असे सांगायला सर्व संचालक आले होते. त्याच वेळी पहिला खटला दाखल केला होता. पण सभासदांच्या रेट्यामुळे सारे जण घरी आले होते, असे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनी आज येथे सांगितले.

‘मविप्र’ निवडणूक जाहीर होताच विरोधकांनी मेळावा घेऊन केलेल्या आरोपांना श्रीमती पवार यांनी निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिले. त्या म्हणाल्या, की नगरसेवक उद्धव निमसे यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सूचना केली होती. त्या वेळी माझ्याप्रमाणेच संचालक मंडळावरील सगळे खटले मागे घ्या; सर्वांनी मिळून तयार होणाऱ्या पॅनलला माझी हरकत नाही, हे मी स्पष्ट केले आहे. आतापर्यंत जवळपास ३२ खटले दाखल करण्यात आले आहेत. आताही पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत असताना निवडणूक होऊ द्यायची नाही, अशी कृती घडत आहे. ही कुठली संस्कृती, हा खरा प्रश्‍न आहे. खटले दाखल केले म्हणजे मी पळून जाईन असा कयास होता. पंधराव्या महिन्यात राजीनामा दिला आणि मी लढणार, हे जाहीर केले. मला निवडणूक लढवता येऊ नये म्हणून सभासद नसल्याचा खटला दाखल केला गेला. तेव्हा ३१ मार्च १९७९ मध्ये मी सभासद असल्याच्या इतिवृत्ताची प्रत, पावती व ठराव हे न्यायालयात सादर केले होते. 

वडनेरच्या शाळेबद्दल बरेच बोलले गेले आहे. सीबीएसईची सनराइज ही शाळा तीन कोटी २५ लाख रुपयांत विकत घेण्यात आली आहे. त्या वेळचा दर योग्य होता. बांधकाम ३५ हजार २०० चौरसफुटांचे आहे. तीन एकरापैकी दोन एकरात इमारत असून, एक एकरवर क्रीडांगण आहे. पूर्व प्राथमिक ते आठवीपर्यंत तेराशे विद्यार्थी शिक्षण घेताहेत. ‘टीडीआर’बद्दलही आरोप झाले.

१७ कोटी १६ लाखांच्या टीडीआर प्रकरणात न्यायालयात खटला दाखल झाला. सर्वोच्च न्यायालयापर्यंत तो गेला. टीडीआर खरेदीसाठी संधी देण्यात आली होती, पण कुणीही पुढे न आल्याने २१ कोटी ५० लाखांचा टीडीआर घेतला. मुळातच सभापतींची व्यवहार पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी होती. पण त्यांनी हात वर केल्याने संचालक मंडळाने न्यायालयातून उपसभापतींना अधिकार घेतले, असे सांगून हुकूमशाही पद्धतीने कारभार केला जात आहे, या आरोपाला श्रीमती पवार यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या, की सरचिटणीसांना दैनंदिन कामकाज पाहावे लागते. अडचणींवर ताबडतोब उत्तर शोधावे लागते. जेवढा देईल तेवढा वेळ कमी पडतो. कार्यकारिणीच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागते. त्यामुळे आजवरच्या सरचिटणीसांना विरोधक हुकूमशहा म्हणत आले आहेत.

संस्था खासगी होऊ शकत नाही
संस्थेच्या तीन वार्षिक सर्वसाधारण सभांत नवीन सभासद करणे आणि त्यासाठी पाच हजार रुपयांचे शुल्क करणे, दोन महिला संचालक करणे, हे विषय होते. त्याप्रमाणे धर्मादाय आयुक्तांकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. नवीन सभासद केले आहेत. त्यांच्याकडून घेण्यात आलेल्या पाच हजारांपैकी चार हजार ८०० रुपये अनामत ठेवण्यात आली आहे. माझ्याआधी एक हजार ६२७ आणि या वेळेस ८२२ सभासद मतदार झाले आहेत. सभासदांची संख्या दहा हजार १४७ पर्यंत पोचली आहे. संस्था खासगी करायची झाल्यास नवीन सभासद करण्याची आवश्‍यकता होती का?, तसेच संस्थेचे दहा विश्‍वस्त नाहीत. संस्थेचे विश्‍वस्त दहा हजारांहून अधिक आहेत. अशा परिस्थितीत संस्था खासगी होऊ शकत नाही. सर्वसाधारण सभासदत्व सोडल्यास सेवा, अशा धोरणानुसार सेवा करण्यात आली. निवृत्तिवेतन घेण्यात येत आहे. आता पुन्हा सभासदत्वाची मागणी केली जात आहे. मात्र, सर्वसाधारण सभा त्यास मान्यता देत नाही. त्यामुळे निवृत्तांना सभासद करण्यास माझा विरोध असण्याचा प्रश्‍न उद्‌भवत नाही, असेही त्यांनी सांगितले.
 

‘निवडणूक लढविणार, हे अण्णांनी सांगितले’
डॉ. वसंतराव पवार यांचे मेहुणे डी. बी. मोगल यांनी नीलिमाताई पवार यांच्याविरुद्ध मेळाव्यात टीका केली होती. त्यास उत्तर देताना नीलिमाताई म्हणाल्या, की अण्णा आणि मी एकाच खोऱ्यातील आहोत. मागील निवडणुकीत त्यांनी सभासदांच्या म्हणण्यानुसार थांबावे लागले. अण्णांची भेट झाली असताना, त्यांनी किती दिवस थांबायचे?, असे म्हणाले होते. तसेच मी निवडणूक लढविणार, हे अण्णांनी सांगितले आहे. माझ्याविरुद्ध कोपरगावचे माहेर, असा प्रचार केला जातो. पण माझे आजोळ निफाडमधील आहे, हेही महत्त्वाचे आहे.

संस्थेने आजवर साधलेल्या उन्नतीचे श्रेय विद्यार्थी, सेवक, पालक आणि सभासद, संचालक मंडळाला आयुष्यभर शिकविले नाही आणि आता निवृत्त झाल्यावरही विरोधक म्हणून काही जण बोलतात मुलगा प्रणव हा राजकारणात उतरणार नाही. त्याने स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहावे यास प्राधान्य डॉ. वसंतराव पवार यांचे ‘बॅक ऑफिस’ मी ३७ वर्षे सांभाळले असून, संपर्काचे काम माझ्याकडे होते सभासद आणि त्यांच्या पत्नीसाठी वैद्यकीय चाचण्या, उपचार, शस्त्रक्रिया विनामूल्य केल्या जातात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com