संगमनेर येथील पेट्रोलपंप दरोड्यातील तिघे गजाआड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

नाशिक - उपनगरच्या के. जे. मेहता रोडवर गावठी कट्टा व मॅगझिन विक्रीसाठी आलेल्या तिघांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून गजाआड केले. वीस दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोलपंपावर या तिघांनी दरोड टाकत साडेसात लाख रुपयांची रक्कम लुटल्याची कबुली दिली. तिघांना आज न्यायालयाने 29 तारखेपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

पोलिस गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलिस शिपाई बाळा नांद्रे यांना काही संशयित गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाली होती. गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या नेतृत्वाखाली के. जे. मेहता रोडवरील जय मल्हार मटण शॉपजवळ पोलिसांनी सापळा रचला. बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पल्सर दुचाकीवरून मटण शॉपजवळ आलेल्या तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत एकाच्या कमरेला 30 हजार रुपयांचा गावठी कट्ट्यासह मॅगझिन आढळले. पोलिसांनी कट्टा आणि पल्सर दुचाकी असा एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.