हज यात्रेत यंदा फडकणार तिरंगा

युनूस शेख
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

जुने नाशिक - हज यात्रेला सौदी अरेबियात दाखल झालेल्या भारतीय हज यात्रेकरूंकडून येत्या मंगळवारी (ता. १५) तिरंगा फडकावत स्वातंत्र्यदिन होणार आहे. नाशिकसह देशभरातून हज यात्रेसाठी रवाना झालेल्या भारतीयांकडून स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकविण्यात येणार आहे, अशी माहिती हज कमिटीचे जिल्हा समन्वय जहीर शेख यांनी दिली.  

पुढील महिन्यात २ सप्टेंबरला बकरी ईद आहे. त्या निमित्ताने देशासह जिल्ह्यातील मुस्लिम बांधव हज यात्रेला रवाना होताहेत. दिल्ली, उत्तर प्रदेशसह नागपूर, औरंगाबाद येथील सुमारे ७० हजार हज यात्रेकरू सौदीत पोचले आहेत.  राज्यातील मुंबई, नाशिकसह अन्य भागातील उर्वरित हज यात्रेकरूंचे पहिले विमान मुंबईतून १९ ऑगस्टला रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार आहे. त्यात राज्यातील हज कमिटी व खासगी टूरचे सुमारे १६ हजार यात्रेकरू टप्प्याटप्प्याने २७ ऑगस्टपर्यंत पोचणार आहे. २६ तारखेला रात्री शेवटे विमानोड्डाण होणार आहे. यात जिल्ह्यातील पाच हजार, तर शहरातील सुमारे ४०० यात्रेकरूंचा समावेश आहे. या वर्षी देशातून एक लाख २५ हजार भाविक हज यात्रेला जाणार आहे.

सातासमुद्रापार स्वातंत्र्यदिन सोहळा 
यंदा हज यात्रेदरम्यान देशाचा स्वातंत्र्यदिन येत असल्याने भारतीय यात्रेकरूंकडून यात्रेच्या ठिकाणी तिरंगा फडकावत १५ ऑगस्ट साजरा होणार आहे. भारतीय यात्रेकरूंची ज्या ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्यात आली तेथे भारतीय मुस्लिम बांधव एकत्र येऊन तिरंगा फडकावून स्वातंत्र्य दिन करणार आहेत. त्यासाठी तिरंगा देशातून रवाना झाल्याची माहिती जहीर शेख यांनी दिली.