कांद्यावर मात, टोमॅटो आणखी कडाडला  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

देवळा -  येथील बाजार समितीत भाजीपाल्याचे भाव अचानक कडाडले असून, आज टोमॅटोला चालू हंगामातील सर्वाधिक भाव १४०० रुपये प्रति क्रेट्‌स मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव दौलतराव शिंदे, देवळा ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे उपाध्यक्ष कारभारी जाधव यांनी दिली. 

येथील बाजार समितीत दोन दिवसांपासून भाजीपाल्याचे भाव कडाडले असून, टोमॅटोला १४०० रुपये क्रेट्‌सप्रमाणे भाव मिळाला. मेथी (१७०० रुपये शेकडा), कोथिंबीर (३८०० ते ४००० रुपये शेकडा), काकडी (४५० रुपये कॅरेट), मिरची (४० रुपये प्रतिकिलो) असा भाव होता. आज टोमॅटोला कमाल १४०० रुपये, तर किमान ७०० ते १२०० रुपयांप्रमाणे भाव मिळाला. मागील काळात देवळा परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने टोमॅटोची आवक कमालीची घसरली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे टोमॅटो आहे त्यांना बऱ्यापैकी भाव मिळत असल्याने समाधानाचे वातावरण आहे. सध्या ‘कसमादे’मधील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डाळिंब, कांद्याला भाव नाही. मात्र, टोमॅटोने शेतकऱ्यांना दिलासा दिला असला तरी बहुतांश शेतकऱ्यांचे टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने ठराविक शेतकऱ्यांनाच त्याचा फायदा होताना  दिसत आहे.