सप्तशृंग मातेच्या नवरात्रोत्सवास उद्यापासून उत्साहात सुरुवात

दिगंबर पाटोळे
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

वणी (नाशिक) :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत सप्तशृंग मातेच्या नवरात्रोत्सवास उद्या (गुरुवार) पासून उत्साहात सुरुवात होत असून, नवरात्रोत्सवातील पहिल्या माळेस उपस्थित राहाण्यासाठी गडाकडे येणारे रस्ते महिला मंडळासह भाविकांनी फुलुन गेले आहे. दरम्यान, आज (बुधवार) सांयकाळी उशिरा पर्यंत प्रशासकीय यंत्रणा गडावर दाखल होवून नवरोत्सवासाठी सज्ज झाली आहे.

वणी (नाशिक) :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत सप्तशृंग मातेच्या नवरात्रोत्सवास उद्या (गुरुवार) पासून उत्साहात सुरुवात होत असून, नवरात्रोत्सवातील पहिल्या माळेस उपस्थित राहाण्यासाठी गडाकडे येणारे रस्ते महिला मंडळासह भाविकांनी फुलुन गेले आहे. दरम्यान, आज (बुधवार) सांयकाळी उशिरा पर्यंत प्रशासकीय यंत्रणा गडावर दाखल होवून नवरोत्सवासाठी सज्ज झाली आहे.

गुरुवारी (ता. २१, अश्विन शुध्द १) ते ता. ३० विजया दशमी (अश्विन शुध्द १०) पर्यंत चालणाऱ्या नवरोत्सवा दरम्यान सप्तश्रृंगी देवी न्यास व गडावर विविध धार्मिक मंडळातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या सकाळी ७ वा. जिल्हा प्रधान न्यायाधीश चंद्रकात शिंदे यांच्या हस्ते देवीची महापूजा होऊन उत्सवास सुरुवात होईल. तत्पूवी न्यासाच्या कार्यालयात देवीच्या दागिन्यांचे पूजन होऊन ब्रम्हवृंदांना वर्दी दिली जाईल. त्यानंतर सकाळी ८ वा. देवीच्या दागिन्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात येईल. देवीची अभिषेक होऊन देवीला शालू नेसवून मुकुट, कमरपट्टा  पावले, मंगळसूत्र, मोहनमाळ आदी दागिने चढविण्यात येऊन पंचामृत महापुजा व आरती संपन्न होईल. यानंतर सकाळी १० वाजता जिल्हा प्रधान न्यायाधिश शिंदे यांच्या हस्ते अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधिश तथा सप्तश्रृंगी देवी ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती यु. एन. नंदेश्वर, तहसिलदार कैलास चावडे, विश्वस्त डॉ. रावसाहेब शिंदे, अॅड. अविनाश भिडे, राजेंद्र सुर्यवंशी, अॅड. जयंत जायभावे, उन्मेष गायधनी, न्यासाचे अधिकारी उपस्थित राहतील.

दरम्यान, उद्या सकाळ पासून नादुंरी-सप्तश्रृंगीगड खाजगी वाहानांसाठी बंद करण्यात येणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस नांदुरी येथे दाखल झाल्या आहे. आज दिवसभर गडावर मंदीराकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या कडेला हॉटेल्स, पुजेचे साहित्य व प्रसादाची दुकाने थाटण्यासाठी व्यवसायीकांची लगबग चालू होती. तर नांदुरी गडाच्या पायथ्याशी व गडावरील धोंड्या कोंड्याच्या विहीर परीसरात महामंडळाचे तात्पुरते बसस्थानक उभारण्याची तयारी अंतिम टप्यात होती. तसेच खाजगी वाहानासाठी नांदुरी ग्रामपंचातीने सशुल्क वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवात मोठया प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. न्यासाच्या प्रसादालयात नवरोत्सव कालावधीत भाविकांसाठी मोफत अन्नछत्र चालविण्यात येणार आहे. पायी जाण-या भाविकांना रात्रीच्या प्रवासासाठी पायवाटेच्या रस्तयावर तसेच गांवातर्गंत रस्त्यावर ग्रामपंचायतीत्यावतीने पथदिपची व्यवस्था करण्यात आली आहे.

आज दिवसभर ग्रामपंचायती तर्फे गावात स्वच्छता मोहीम राबवून, डासांसाठी धुराडा सोडण्यात आला. मुबलक व स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छता राखन्यासाठी प्रयत्नशिल असल्याची माहिती सरपंच सुर्यवंशी, ग्रामविकास अधिकारी आर. बी. जाधव, ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी यांनी दिली.  दरम्यान रात्री उशिरा पर्यंत गडावरुन मशाल प्रज्वलीत करुन आपल्या गावाकडे मशाल ज्योत घेवून जाणाऱ्या जिल्ह्यैतील देवी मंडळाच्या भाविकांची रिघ लागण्याने नाशिक, पिंपळगाव, कळवण आदी मार्गावरचे रस्ते मशालींच्या प्रकाशाने उजळले होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: nashik news vani Navratri festival starts from the beginning