पतीराजांच्या दीर्घायुष्यासाठी आधुनिक सावित्रींची लगबग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

नाशिक - वटपौर्णिमेच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील मुख्य बाजारपेठ विविध साहित्याने सजली. पतीराजांच्या दीर्घायुष्यासाठी आधुनिक सावित्रींची लगबग पाहायला मिळाली. 

नाशिक - वटपौर्णिमेच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील मुख्य बाजारपेठ विविध साहित्याने सजली. पतीराजांच्या दीर्घायुष्यासाठी आधुनिक सावित्रींची लगबग पाहायला मिळाली. 

आधुनिक पेहराव परिधान केलेल्या नोकरदार महिलांनीही वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी साहित्य खरेदीकरिता गर्दी केली होती. पुणे-मुंबईपाठोपाठ नाशिकही आधुनिक शहर होत आहे. मात्र, त्यातही आपली परंपरा न सोडता महिलांनी वटपौर्णिमेसाठी आंबे, वाण, सूत आदींची खरेदी केली. रविवार कारंजा, मेन रोड आदी भागात वटपौर्णिमेचे साहित्य विक्री होत होते. शेतकरी संपाची पार्श्‍वभूमी असली, तरीही मोठ्या प्रमाणावर गावठी छोटे आंबे बाजारात दाखल झाल्याने ते ३०-४० रुपये किलोने विक्री होत होते. पूजेसाठी लागणारे वाण १० रुपयांपासून होते. पूजेचे ताट खास लेस लावलेल्या तबकासह विक्रीस होते.