केंद्रातून पाणी चोरून तारांकित हॉटेलांना विक्री 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

सिडको - अंबड रस्त्यावर "गेट वे' हॉटेलमागे महापालिका जलपुनर्भरण केंद्रावर टॅंकरमध्ये अवैध पाणीसाठा करून त्याची तारांकित हॉटेलला चढ्या भावाने बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीचा प्रभाग 27 चे नगरसेवक राकेश दोंदे यांनी पर्दाफाश केला. 

सिडको - अंबड रस्त्यावर "गेट वे' हॉटेलमागे महापालिका जलपुनर्भरण केंद्रावर टॅंकरमध्ये अवैध पाणीसाठा करून त्याची तारांकित हॉटेलला चढ्या भावाने बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीचा प्रभाग 27 चे नगरसेवक राकेश दोंदे यांनी पर्दाफाश केला. 

मंगळवारी (ता. 16)च्या मध्यरात्री दोनला उघडकीस आलेल्या या पाणीचोरीप्रकरणी नगरसेवक श्री. दोंदे यांनी संबंधित टॅंकरचा नंबर, चालकाचे नाव, पाण्याचा बेकायदेशीर साठा असा सर्व तपशील महापालिका पाणीपुरवठा अभियंता संजीव बच्छाव यांच्या निदर्शनास आणून दिला. आता अधिकारी याप्रकरणी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. श्री. दोंदे घरी आलेल्या पाहुण्यांना रात्री नाशिक रोड रेल्वेस्थानक येथे पोचवून घरी परत येत होते. त्या वेळी महापालिकेच्या जलपुनर्भरण केंद्रावर संशयास्पद स्थितीतील टॅंकर (एमएच 15, जी 7528) मध्ये पाण्याचा साठा भरला जात होता. ही पाणीचोरी पाहून दोंदे यांनी वाहन थांबवून संबंधित टॅंकरचालकाकडे याबाबत विचारणा केली. मद्यधुंद स्थितीतील चालकाने, "आम्ही मध्यरात्री टॅंकरमध्ये पाणी भरून सकाळी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये खाली करतो', असे बेजबाबदारपणे सांगितले. या ठिकाणी महापालिकेचा रखवालदार नसल्याचे स्पष्ट करीत, येथे बऱ्याच वेळाने उपस्थित झालेल्या व्हॉल्व्हमनने आपण राउंडवर असल्याचे व अनुपस्थितीत पाणीचोरी झाल्याचे सांगितले. श्री. दोंदे यांनी संबंधित पाणीपुरवठा विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून वारंवार संपर्क साधूनही अधिकारी प्रतिसाद देत नव्हते. उन्हाळ्याचा कडाका सुरू झालेला नसताना महापालिका गंगापूर धारणातील पाणीसाठ्याचे नियोजन करीत आहे. तर दुसरीकडे महापालिकेच्याच जलपुनर्भरण केंद्रावरून पाण्याची मध्यरात्री चोरी करून त्याची तारांकित हॉटेल्सना चढ्या भावात खुलेआम विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. 

Web Title: nashik news water hotel