पाणीपातळी वाढल्याने धावपळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

व्यावसायिक धास्तावले; पूर पाहण्यासाठी गर्दी

पंचवटी - काल (ता. १९) रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे आज जलसंपदा विभागाने गंगापूर धरणातून पाच हजार सहाशे क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात सोडल्याने पाणीपातळीत वाढ झाली. सर्व सांडवे पाण्याखाली गेले. दुपारनंतर वाढलेल्या पाणीपातळीमुळे नदीकाठच्या व्यावसायिकांची धावपळ उडाली. 

गंगापूर धरणातून आज सकाळी विसर्ग करण्यात आला. दशक्रियासह अन्य विधींसाठी सकाळी रामकुंडावर आलेल्यांची धावपळ उडाली. वाढलेल्या पाण्यामुळे वाहने लावणाऱ्यांनाही वाहने तेथून हटवावी लागली. काही दुचाकी वाहून गेल्याची अफवाही पसरली.

टपरीधारकांना मनस्ताप
गेल्या महिन्यात वाढलेल्या पाणीपातळीनंतर नदीकिनाऱ्यावरील अनेक व्यावसायिकांनी टपऱ्या सुरक्षित ठिकाणी हटविल्या होत्या. पाऊस थांबल्याने पातळीही झपाट्याने पूर्वपदावर आली. अनेक व्यावसायिकांनी टपऱ्या पुन्हा नदीकिनारी आणल्या होत्या. आज सकाळपासून पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने या टपरीधारकांचे 
धाबे दणाणले. 

गाडगे महाराज पुलावर कोंडी
गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीवरील सर्वच सांडव्यांवरील वाहतूक बंद पडली. त्यामुळे पंचवटीला जाण्यासाठी अहिल्यादेवी होळकर, रामवाडी व गाडगे महाराज पूल असे पर्याय आहेत. काही दिवसांपासून गाडगे महाराज पुलावर चारचाकी वाहने लावली जात असून, त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा ठरत आहे. पूर पाहण्यासाठी झालेली गर्दी त्यातच भर पुलावर उभ्या केलेल्या चारचाकींमुळे मोठी कोंडी 
होत आहे.

स्कार्पिओला पाण्यातून काढले
नांदेडजवळील ब्राह्मणवाडा येथील सुखदेवसिंग गोविंदसिंग स्कार्पिओत (एमएच १५ एके ५४५३) कामासाठी गंगाघाटावर आले होते. अचानक वाढलेल्या पाण्यात रोकडोबा मंदिराजवळ नदीकिनारी उभी केलेली स्कार्पिओ सकाळी दहाच्या सुमारास वाहून गेली. बाराच्या सुमारास पंचवटी अग्निशामक दलाच्या जवानांनी तिला बाहेर काढले. यात जे. एस. अहिरे, पी. आर. पगारे, व्ही. आर. गायकवाड आदींनी सहकार्य केले.