पाणीपट्टी थकबाकीदारांकडून सुमारे दोन कोटींची वसुली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

नाशिक - महापालिकेच्या करवसुली विभागाने पाणीबिलाच्या थकबाकीदारांना दिवाळीपूर्वी पाठविलेल्या नोटिसांनंतर सुमारे दोन कोटींची वसुली करण्यात आली. 

६७ हजार ८४१ थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या होत्या. मुदतीच्या आत थकबाकी न भरल्यास नळजोडणी तोडण्याचा इशारा दिला होता. सहा विभागांत मागील थकबाकी चार कोटी सात लाख २४ हजार ९२७ थकबाकी होती. चालू थकबाकी एक कोटी ९५ लाख ९९ हजार २४९ रुपये अशी सहा कोटी तीन लाख २४ हजार १७६ रुपये थकबाकी होती. चालू थकबाकी एक कोटी ९५ लाख ९९ हजार २४९ रुपये वसूल करण्यात आले.

टॅग्स