रहिवासी परिसरातील मद्याचे दुकान बंद करा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

नाशिक रोड -  नाशिक-पुणे मार्गावरील फेम चित्रपटगृहामागील श्री श्री रविशंकर मार्गावरील मद्याचे दुकान बंद करण्यासाठी महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या दुकानाच्या परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार महादेव पार्कमधील महिलांनी उपनगर पोलिस ठाण्यात दिली.

नाशिक रोड -  नाशिक-पुणे मार्गावरील फेम चित्रपटगृहामागील श्री श्री रविशंकर मार्गावरील मद्याचे दुकान बंद करण्यासाठी महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या दुकानाच्या परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार महादेव पार्कमधील महिलांनी उपनगर पोलिस ठाण्यात दिली.

न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या पाचशे मीटर आतील दारूची दुकाने बंद केली. फेम चित्रपटगृहामागे एकाने दारूचे दुकान सुरू केले आहे. फेम चित्रपटगृह परिसर उच्च-मध्यमवर्गीयांचा ओळखला जातो. परिसरात महादेव पार्क या इमारतीत दुकान सुरू झाले आहे. महाराणी नावाच्या या दुकानात रोज सायंकाळी मद्यपींची गर्दी असते. महिला, मुले या परिसरात फिरण्यासाठी येतात. हे दुकान बंद करावे, अशी मागणी याच इमारतीतील महिलांनी उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाजीराव महाजन आणि सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर यांच्याकडे केली. उपनगर पोलिस ठाण्यात बैठक झाली. सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर उपस्थित होते. दुकानदाराच्या विरोधात महिलांनी पोलिस आयुक्तांच्या नावे पत्र दिले आहे. दुकान बंद न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला.

विवाहितेचा छळ करून ६५ लाखांचा अपहार 
लग्नात काहीच वस्तू आल्या नाहीत, असे म्हणत विवाहितेचा छळ करून तिच्या बॅंक खात्यामधून परस्पर ६५ लाख काढून घेतल्याचा प्रकार घडला. बडोदा येथील ऋतिका ऋषभ सुराणा यांचा पती ऋषभ यशवंतसिंगजी सुराणा यांनी सासरी (सावरकरनगर, नाशिक) येथे २०१२ पासून छळ व मारहाण करत दोघांच्या नावे असलेल्या जॉइंट बॅंक खात्यामधून पत्नी ऋतिका यांची परवानगी न घेता ६५ लाख रुपये आपल्या खात्यावर वर्ग केले. लग्नात आलेले सोन्या-चांदीच्या दागिन्यांचाही अपहार केला. या प्रकरणी गंगापूर रोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.