दारू दुकानाविरोधात पोलिस आयुक्तांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

नाशिक - दिंडोरी रोडवरील भवानी अपार्टमेंटमध्ये असलेल्या अमित वाइन शॉपविरोधात स्थानिक महिलांनी सुरू केलेले आंदोलन आज सातव्या दिवशीही सुरू होते. दुकान उघडल्यापासून महिलांनी दुकानासमोर ठाण मांडले व ग्राहकांना फिरकू दिले नाही. दरम्यान, आज दुपारी आंदोलनकर्त्या महिलांनी पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांना भेटून निवेदन दिले. 

तीन दिवसांपासून दुकान उघडले असून, दुकानापासून काही अंतरावर आंदोलक महिला ठाण मांडून बसल्या आहेत. एकाही ग्राहकाला त्या दुकानाच्या काउंटरपर्यंत पोचू देत नाहीत. सायंकाळी मोठ्या संख्येने ग्राहक येतात. अनेकदा वादावादीचेही प्रसंग उद्‌भवले. मात्र, महिलांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवले आहे. आज आंदोलनकर्त्या महिलांनी डॉ. सिंगल यांची भेट घेऊन निवेदन दिले. दुकान कायमस्वरूपी बंद करण्याचे अधिकार आमच्या कक्षेत नाहीत. त्यामुळे या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले. 

महाराणी वाइनविरुद्धही निवेदन
दरम्यान रविशंकर मार्गावरील महाराणी वाइन हे दुकान हटविण्यासाठी महंत डॉ. बिंदू महाराज, स्वामी सागरानंद सरस्वती, महंत दीपानंद सरस्वती यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी पोलिस आयुक्तांना निवेदन दिले.

टॅग्स