बंद ठेवण्याचा निर्णय झुगारला; दारू दुकानासमोर महिलांचा ठिय्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

नाशिक - दिंडोरी रोडवरील अमित वाइन शॉपविरोधात चार दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. काल झालेल्या बैठकीत हे दुकान पाच दिवस बंद ठेवण्याचे ठरले असतानाही आज दुपारी चारला दुकान उघडण्यात आले. त्यामुळे आंदोलक महिलांनी या दुकानासमोरच ठिय्या मांडत पुन्हा आंदोलन सुरू केले. दुकान उघडे असले, तरी एकही ग्राहक या महिलांचे आंदोलन भेदून दुकानापर्यंत पोचू शकला नाही. 

आरटीओ कॉर्नर परिसरातील अमित वाइन्सबाबत काल म्हसरूळ पोलिस ठाण्यात आंदोलक महिला, पोलिस अधिकारी व दुकानदाराचे प्रतिनिधी अशी बैठक झाली. तीत हे दुकान पाच दिवस बंद करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आज दुपारपर्यंत हे दुकान बंद होते. परंतु दुपारी चारनंतर दुकान उघडले. त्यानंतर तातडीने महिला दुकानापासून काही अंतरावर ठाण मांडून बसल्या. दुकानात येणाऱ्या एकाही ग्राहकाला महिलांनी काउंटरपर्यंत पोचू दिले नाही. सुरवातीला काही वेळ महिला पोलिसही या ठिकाणी होत्या. ग्राहकांची गर्दी झाल्याने वाहतुकीलाही अडथळा येत होता. अनेक ग्राहक महिलांशी अरेरावीची भाषा करत होते, तर कुणी विनवणीही करत होते. परंतु दुकान बंद होईपर्यंत त्यांनी एकाही ग्राहकाला फिरकू दिले नाही.