नाशिक: विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पाच जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

वरखेडा येथील स्वाती अमोल भुसाळ (वय १९) हिने राहात्या घरात दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबतची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन स्वातीच्या माहेेरी घटनेची माहिती कळवून स्वातीस येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकिय अधिकाऱ्यांनी स्वातीस मृत घोषित केल्याने पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद केली.

वणी : वरखेडा (ता. दिंडोरी) येथे तीन महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली अाहे. दरम्यान विवाहितेस सासरच्यांनी मारून टाकल्याची तक्रार केल्याने पती, सासु सासऱ्यांसह पाच जणांवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे.

वरखेडा येथील स्वाती अमोल भुसाळ (वय १९) हिने राहात्या घरात दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबतची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन स्वातीच्या माहेेरी घटनेची माहिती कळवून स्वातीस येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकिय अधिकाऱ्यांनी स्वातीस मृत घोषित केल्याने पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद केली.

दरम्यान याबाबतची माहिती स्वातीचे रामनगर (बेरवाडी), ता. निफाड येथील नातेवाईकांना मिळताच नातेवाईकांनी वरखेडा येथे धाव घेतली, मात्र स्वातीस वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्याने स्वातीच्या माहेरील नातेवाईकांनी आम्ही घटनास्थळी येण्या अगोदरच वणी रुग्णालयात का हलविल्याची पोलिसांना विचारणा करीत वणी ग्रामीण रुग्णालयात पोलिस निरीक्षक अनंत तारगे व पोलिसांना घेराव घातला. यावेळी अनंत तारगे यांनी घटनास्थळावरून स्वातीस उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले असल्याचे नातेवाईकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्वातीच्या सासरच्यांना खुनाचा गुन्हा दाखल करावा, संशयीतांना आमच्या समोर आणावे याची मागणी करीत संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयासमोरील वणी नाशिक रस्त्यावर अर्धा तास रस्ता रोको केला.

यावेळी वणी ग्रामिण रुग्णालय व परीसरात तणावाची परीस्थिती निर्माण होत असताना पोलिस निरीक्षक तारगे यांनी संतप्त जमावाची समजूत काढून आपण देत असलेल्या तक्रारीवरुन खुनाचा गुन्हा नोंदवित असल्याचे सांगितल्यानंतर जमाव काहीसा शांत झाला. दरम्यान स्वातीचे चुलते मधुकर पर्बत खालकर (वय ५५ रा. रामनगर) यांनी स्वातीचे सासरे सुरेश रावजी भुसाळ, सासु हिराबाई भुसाळ, पती अमोल सुरेश भुसाळ, दिर मयुर भुसाळ रा. वरखेडा व ननंद सोनिता योगेश आहेर रा. हिरावाडी, नाशिक यांनी स्वातीस लग्नात योग्य मानपान दिला नाही, स्वयंपाक करता येत नाही, घरकाम जमत नाही यावरून स्वातीस मारहाण करुन स्वातीने माहेरुन पैसे आणावे असा तगादा लावला होता. माहेरच्यांनी लोकांनी हुंडा दिला नाही म्हणूनच नायलॉन दोरीने गळा आवळून तिस जीवे ठार मारले असल्याची फिर्याद दिली.

त्यानूसार पोलिसांनी स्वातीचे पती, सासु, सासरे, दीर, ननंद यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविला असून पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. दरम्यान रात्री उशिरा स्वातीच्या मृतदेह नातेवाईकांच्या मागणीनूसार नाशिकला शवविच्छेदनासाठी हलिवण्यात आले आहे. स्वातीचे १७ मे २०१७ रोजी चांदोरी येथे अमोल भुसाळ यांच्यासोबत थाटामाटात विवाह झाला होता. स्वातीने नुकतीच बी. एस्सीची परीक्षेत ८२ टक्के गुण मिळवून उज्वल यश संपादन केल्याची माहिती देत स्वातीच्या मृत्युबाबत हळहळ व्यक्त केली.