भुजबळ यांच्या अनुपस्थितीचा शिवसेनेला फायदा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

नाशिक- माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीत लढणाऱया राष्ट्रवादी काँग्रसने जिल्ह्यात 3 नगरपालिका गमावल्या आहेत. भाजपला येवला येथे बहुमताविना नगराध्यक्ष पदाचा लाभ झाला आहे. तीन जागांवर सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीची पिछेहाट झाली आहे. तर एकमेव भगूर नगरपालिका ताब्यात असलेल्या शिवसेनेकडे 4 नगरपालिकांवर भगवा फडकला आहे. मनमाड, येवला सटाणा अशा तीन नगरपालिकांत धक्का बसला आहे.

जिल्ह्यात भगूर, येवला, सिन्नर, मनमाड, नांदगाव व सटाणा या सहा नगरपालिकांत शिवसेनेचे 4 जागावर नगराध्यक्ष झाले. सटाण्यात स्थानीक विकास आघाडी तर येवला येथे भाजपचा नगराध्यक्ष झाला. 6 पैकी 4 ठिकाणी शिवसेना, येवला येथे भाजप तर सटाण्यात स्थानीक विकास आघाडीला सत्ता मिळाली आहे.

गेल्या वेळी शिवसेनेची एकमेव भगूरला सत्ता होती. यावेळी सिन्नर, नांदगाव, मनमाड या 3 जागावर शिवसेनेने मिळविल्या आहे. या नगरपालिकांवर राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यामुळे माजीमंत्री छगन भुजबळ यांची अनुपस्थिती राष्ट्रवादीला भोवली. येवला येथे मात्र राष्ट्रवादीचे नगरसेवक बहुमताने निवडून आले. पण नगराध्यक्ष मात्र भाजपचे बंडू क्षीरसागर यांनी व्यक्ती केंद्रीत पध्दतीने स्वताकडे राखले. राष्ट्रवादीच्या घटलेल्या जागांवर तीन जागा शिवसेनेच्या वाढल्या आहेत.

शिवसेना प्रथमक्रमांकावर
सहा नगरपालिकात 137 जागांपैकी शिवसेना 67 जागा आणि 4 नगराध्यक्ष पद प्रथम क्रमांकावर आहे. 20 जागा व येवला येथील एकमेव नगराध्यक्षपद जिंकून भाजप दुसऱया स्थानावर आहे. तर 25 जागा जिकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने येवला येथे बहुमत असूनही नगराध्यक्षपद गमविले आहे. त्यामुळे हा पक्ष तिसऱया स्थानावर आहे. काँग्रेसला 9 जागा मिळाल्या. 8 जागावर अपक्ष, सटाण्यात 6 जागावर स्थानीक विकास आघाडी तर मनमाडला रिपाईने 2 जागा जिंकल्या आहेत.

उत्तर महाराष्ट्र

नाशिक - यंदाच्या हज यात्रेस गेलेल्या भारतीय मुस्लिम यात्रेकरूंकडून सौदी अरेबियात उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा झाला....

02.00 AM

सोनगीर (जिल्हा धुळे): येथे स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत गोंधळ अनावर झाल्याने ग्रामसभा मध्येच तहकूब करण्यात आली. याप्रकरणी ग्रामसभेचे...

बुधवार, 16 ऑगस्ट 2017

सोनगीर (जि. धुळे) : झोपडी जळून सर्वस्व खाक झाले. संसारोपयोगी भांडी, कपडे, अन्नधान्य, मुलांचे दप्तर एवढेच नव्हे तर रेशन कार्ड...

बुधवार, 16 ऑगस्ट 2017