वणी (नाशिक) - ग्रामिण भागाची जीवनवाहीनी असलेली लालपरी आजारी

bus
bus

वणी (नाशिक) -  सर्वांची जिवाभावाची, सुख-दुःखात साथ देणारी, ग्रामिण भागाची जीवनवाहीनी असलेली लालपरी अर्थात एसटी आधीच आजारी व त्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या खड्डेयुक्त रस्ता अभियानाने गंभीर झाली असून, दैनंदिन प्रवास करणाऱ्यांचे कंबरडे गेलेच आहे. मात्र इच्छित स्थळास पोहचणेही लाल परीच्या आजाराने अनिश्चित झाले आहे.

पावसाळ्यापूर्वी ग्रामिण भागातील मलमपट्टी केलेले रस्ते गेल्या तीन महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्तृत्वाने 'होत्याचे नव्हते' झाले. या रस्त्यावर अंध असो वा अपंग असो, स्त्री असो वा पुरुष असो, म्हातारा असो वा तरुण असो, लहान असो वा मोठा असो कोणताही भेदभाव न करता सर्वांना वर्षानुवर्षे एकत्र घेवून आपले दु·खने सहन करीत व गतीरोधकावरुनही सुसाट धावणारी लाल परी चा खडखडाट झाला आहे. सुरक्षित प्रवासाची हमी देणारी एसटीच आता प्रवाशांसाठी धोकादायक ठरु पाहात आहे. खराब रस्त्या  तसेच आयुष्यमान संपत चाललेल्या गाड्या वापरल्या जात असल्याने गाड्याच्यां नादुरुस्ती प्रमाण वाढत चालले आहे. 

रस्त्यात मध्येच गाडी बंद पडण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. त्यामूळे प्रवाशांची आवस्था सहनही होत नाही, सांगताही येत नाही अशी आवस्था झाली आहे. यात प्रामुख्याने दैनंदिन प्रवास करणारे चाकरमाने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच जेष्ठ नागरिक, दिव्यांग व रुग्णांना त्रासदायक ठरत आहे. त्यात रस्त्यांच्या दुरावस्थेमूळे बसेस वेळापत्रकही कोलमडले असून सर्वसाधारण कळवण ते नाशिक दोन तासाचा प्रवास तीन तासाचा झाला आहे. त्यामूळे साहाजिकच बसेसला लागणारे इंधनाचा वापर वाढला असून त्यात दररोजचे वाढणारे डिझेल-पेट्रोलचे दर, बसेसचे नादुरुस्तीचे प्रमाण अधिक वाढल्याने आर्थिक फटकाही महामंडळास सहन करावा लागत आहे. 

त्यातच संघटना, राजकिय पक्षांचे मोर्चे, बंद, निदर्शने यात जीवनवाहीनी लालपरीला समाजकटंकाचा विनाकारण दगडांचा मार खावा लागतो किंवा आगीत होळपळावे तरी लागते.
 त्यात बसेसची संख्याही मर्यादीत असल्यामूळे अशा बसेसची दुरुस्ती करुन बसेस रस्त्यावर आणल्या जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com