आमदारांच्या गटाला एकही जागा नाही; गितेंची व्यूहरचना कामी

Election
Electionesakal

नाशिक : निफाड तालुक्यात प्रतिष्ठेची लढाई असलेली शिंगवे विविध कार्यकारी सहकारी विकास सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शहाजी डेर्ले व गोकुळ गिते यांच्या नेतृत्वाखाली जय मल्हार पॅनलने विरोधकांना चारिमुंड्या चित करत एकहाती विजय मिळवला. या पॅनलचे सर्व १३ उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येताच गावात ‘जय मल्हारचा’ एकच जल्लोष झाला. या निवडणुकीत आमदार दिलीप बनकर यांनी वैयक्तिक लक्ष घातले होते, तरीही गोकुळ गिते यांच्यावर मतदारांनी विश्‍वास व्यक्त केला.

शिंगवे सोसायटीची वेगळी ओळख जपण्यासाठी ‘जय मल्हार सहकार पॅनल’ची निर्मिती झाली. सोसायटीच्या सभासदांनी आता कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता जय मल्हार पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडुन द्या, असे आवाहन पॅनलचे नेते शहाजी डेर्ले यांनी केले. तत्पूर्वी, ही निवडणूक बिनविरोधसाठी ज्येष्ठ नेत्यांसह गोकुळ गिते यांनीही खूप प्रयत्न केले. पण विरोधकांनी त्यांचा प्रस्ताव फेटाळून लावला. प्रचारात घेतलेली आघाडी आमदार बनकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी वैयक्तिकरित्या या निवडणुकीत लक्ष घातले आणि कार्यकर्त्यांना फोन करुन मतदानाचे आवाहन देखील केले.

परंतु, मतदारांच्या विश्वासाच्या बळावर जय मल्हार पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. विरोधकांचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे शहाजी डेर्ले व गोकुळ गिते यांच्या नेतृत्त्वाची कसोटी बघणारी ही निवडणूक होती. पॅनलचे उमेदवार निवडुन आणण्यासाठी मा सरपंच प्रभाकर रायते रतन गिते रामदास गिते साहेबराव डेरले आदिनीं परिश्रम घेतले.

Election
त्र्यंबकेश्वर येथे नित्यानंद राय यांच्या उपस्थितीत ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ संपन्न

यामुळे झाला एकतर्फी विजय

पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे माजी संचालक राहिलेले गोकुळ गिते यांनी संपूर्ण राजकीय कसब पणाला लावत पॅनल निर्मिती केली. पॅनलमध्ये ज्येष्ठ उमेदवारांना आदराचे स्थान देत त्यांना मानसन्मान दिला. नवीन उमेदवारांना संधी देताना त्यांची निवड कुठेही चुकणार नाही, याची विशेष काळजी घेतली. गोकुळ गिते यांनी केवळ उमेदवारीच केली नाही तर भगीरथ गिते यांना तब्बल ११० मतांनी पराभवाची धूळ चारली. तसेच शहाजी डेर्ले यांनी निवृत्त पोलिस उपअधीक्षक प्रभाकर रायते यांचा पराभव केला.

उमेदवारांना मिळालेली मते

गोकुळ गिते - ४४३ ,शहाजी डेर्ले -४३३,सुभाष कोरडे-३६३,प्रवीण डेर्ले -४००,रंभाजी डेर्ले - ४३५,विलास डेर्ले - ३८९,संजय मोगल -३७८,सोपान रायते -४२३,जगन शिंदे -३७८, राजाभाऊ सानप-४०३, सीनाबई डेर्ले -३९०,सिंधुबाई डेर्ले - ४३९, सुभाष कटारे- ४२३.

शिंगवे सोसायटीच्या निवडणुकीत मतदारांनी आमच्या पॅनलवर विश्वास दाखवित एकहाती सत्ता दिली आहे. त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवत मतदारांना दिलेला शब्द पाळू.

- गोकुळ गीते, जय मल्हार पॅनल

Election
आंतरराष्ट्रीय योग दिन : केंद्रीय गृहराज्यमंत्री त्र्यंबकेश्वर येथील योग शिबिरात; पहा Photos

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com