संयुक्‍तपूर्व परीक्षेतून 800 पदांवर भरती

MPSC
MPSCesakal

नाशिक : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट- ब संयुक्‍त पूर्व परीक्षा २०२२ संदर्भात दिशानिर्देश जारी केले आहेत. त्‍यानुसार या परीक्षेच्‍या माध्यमातून राज्‍य शासनाच्‍या विभागांतर्गत विविध संवर्गातील आठशे पदांची भरती केली जाणार आहे. या परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी १५ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करावा लागणार आहे.

MPSC
उपजिल्हाधिकारी असल्याचं भासवून सत्कार स्वीकरणाऱ्या मुलीला mpsc ने केले debar

अर्ज भरण्याची प्रक्रिया शनिवार (ता. २५)पासून सुरू होणार असून, या १५ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करता येईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ ही परीक्षा ८ ऑक्‍टोबर घेण्याचे नियोजित आहे. प्रशासन विभागातील सहाय्यक कक्ष अधिकारी, गट- ब या संवर्गातील ४२ पदांचा समावेश आहे. वित्त विभागांतर्गत राज्य कल निरीक्षक ७७ पदे, गृह विभागातील पोलिस उपनिरीक्षक ६०३ पदे, महसूल व वन विभागांतर्गत दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षक ७८ पदे अशी एकूण आठशे पदे या परीक्षेच्‍या माध्यमातून भरली जाणार आहेत.

"संयुक्‍तपूर्व परीक्षेच्‍या तारखांची घोषणा झाल्‍याने स्‍पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आठशे पदांवर भरती होणार असल्‍याने होतकरू युवकांनी या संधीचे सोने करावे, अशा संधी वारंवार येत नसतात, ही बाब लक्षात घ्यावी."

-प्रा. राम खैरनार, संचालक, युनिव्हर्सल फाउंडेशन.

MPSC
Nashik : महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा जुलैत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com