Police Caught taking Bribe
Police Caught taking Bribeesakal

लाच मागणाऱ्या हवालदाराला अटक; 23 दिवसांनंतर गुन्हा दाखल

म्हसरूळ (जि. नाशिक) : खोटी तक्रार न नोंदविण्याच्या मोबदल्यात तक्रारदार युवकाकडे २० हजार रुपयांची लाच (bribe) मागणाऱ्या हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. याप्रकरणी २३ दिवसांनंतर आडगाव पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राजेश हरी थेटे (वय ५१, नेमणूक आडगाव) असे लाच मागणाऱ्या संशयित हवालदाराचे नाव आहे. (Constable arrested for soliciting bribe case Filed after 23 days nashik News)

याबाबत २७ वर्षीय तरुणाने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली हाेती. या तक्रारीनुसार, आडगाव पोलिस ठाण्यात धनादेश न वटल्याप्रकरणी तक्रारदार तरुणाविरोधात एकाने तक्रार दिली होती. त्यामुळे हे प्रकरण मिटवून देण्यासाठी, त्याचप्रमाणे तक्रारदाराविरोधात व्याजाने पैसे दिले, अशी खोटी तक्रार न नोंदविण्यासाठी लाचखोर अंमलदार थेटे यांनी तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. लाच मागितल्याचे पुरावे व तसे रेकाॅर्डिंग एसीबीला सादर केले. त्यानंतर पथकाने सापळा रचला. २५ एप्रिलला थेटे यांनी तक्रारदाराकडे २० हजारांची मागणी केली. त्यानंतर थेटे यास संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केली. अखेर तपासाअंती पथकाने थेटे यास लाचेची मागणी केल्याप्रकरणी अटक केली आहे.

Police Caught taking Bribe
Nashik : घोटभर पाण्यासाठी जनावरांची वणवण भटकंती

एसीबीचे पाेलिस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर अधीक्षक नारायण न्याहळदे, उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या पथकातील सहाय्यक उपनिरीक्षक भालेराव, हवालदार गोसावी, डोंगरे, पोलिस नाईक इंगळे व मानकर यांनी ही कारवाई केली.

Police Caught taking Bribe
Nashik : 4 महिन्यात 4 हजार जन्म मृत्यू दाखल्यांचे वितरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com