खाद्यतेलात महागाईचा तडका! महिलांचे आर्थिक नियोजन बिघडले

खाद्यतेलाच्या किमती वधारल्याने महिला त्रस्त झाल्या असून, गृहिणींचे स्वयंपाकघरातील आर्थिक गणित बिघडले आहे.
edible oil rate increases
edible oil rate increases e-sakal

येसगाव (जि. नाशिक) : खाद्यतेल (edible oil) दरवाढीने उच्चांक गाठला आहे. दरवाढीमुळे महिला त्रस्त झाल्या असून, गृहिणींचे स्वयंपाकघरातील आर्थिक गणित बिघडले आहे. डाळींपाठोपाठ खाद्यतेलाच्या किमती वधारल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. (Edible oil rate increases)

दरवाढीमुळे बिघडले आर्थिक नियोजन

दररोजच्या आहारात खाद्यतेलाचा उपयोग केला जातो. वेगवेगळ्या कुटुंबांत आवडीनुसार पामतेल, सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणा, करडई तेल हे रोज स्वयंपाकात वापरले जाते. तेलाचे भाव वाढल्याने महिलांनी आहारात खाद्यतेलाचा वापर कमी प्रमाणात सुरू केला आहे. यामुळे भाज्यांना तडका देणे महाग झाले आहे. कोरोना संसर्गामुळे (corona virus) अनेकांचे व्यवसाय (bussiness) बंद आहेत. आर्थिक चणचण असतानाच खाद्यतेल, डाळी, गॅस सिलिंडर (gas cylinder) आदींची दरवाढ व महागाई नाकेनऊ आणणारी ठरत आहे. अक्षयतृतीयेला घरोघरी गोड जेवण व तळण काढले जाते. तळणाचे पदार्थ पित्रांसाठी नैवेद्यापुरतेच करायचे काय, असा प्रश्‍न ग्रामीण भागामधून मजूर कुटुंबीय करीत आहेत. शासनाने महागाईला आळा घालावा, अशी मागणी सामान्य नागरिक करीत आहेत.

edible oil rate increases
Coronavirus : दम्याचा त्रास आहे? मग घ्या विशेष काळजी

तेलाच्या प्रतिकिलो किमती अशा :

पामतेल - १३५ रुपये

सोयाबीन - १४५

सूर्यफूल - १८०

शेंगदाणा - १७५

edible oil rate increases
बाबो, केवढी ही गर्दी; गुजरातमध्ये कोरोना नियम धाब्यावर (Video)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com