दीड एकरवर आधुनिक रेशीम शेती; वर्षाला 8-9 लाखांचे विक्रमी उत्पन्न

Farmer Sakhahari Jadhav
Farmer Sakhahari Jadhavesakal

इगतपुरी (जि. नाशिक) : पारंपरिक शेतीतून (Traditional Farming) मिळणारे उत्पादन, त्याचा खर्च आणि मिळणरा बाजारभाव हे समीकरण तोट्याचे होत चालले आहे. रासायनिक खतांमुळे (Chemical Fertilizer) मातीची सुपीकता अन् जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. जमिनीचा कस (Soil fertility) हा चिंतेचा विषय असून, सेंद्रिय शेतीतून ( Organic farming) कमी श्रमात व कोणत्याही हंगामात आधुनिक आंतरराष्ट्रीय रेशीम शेतीतून (Silk Farming) नवीन रोजगार मिळत आहे. इगतपुरी तालुक्यातील कृष्णनगरचे शेतकरी सखाहरी जाधव यांच्या अनोख्या प्रयोगामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Farmer Modern silk farming Record income of 8-9 lakhs per annum at igatpuri Nashik News)

श्री. जाधव यांनी ड्रीपच्या माध्यमातून दीड एकर शेतीत रेशीम लागवड करण्याचा यशस्वी प्रयोग केला. पिकलेला रेशमाचा पाला अथवा तुती हे अळ्यांचे खाद्य असून, त्यांनी त्यासाठी वीस बाय पन्नासचे शेड उभे केले. तीस दिवसांत अळ्या तयार होतात. त्यांची रेशीम जालना येथे विक्रीसाठी जाते. तुती लागवडीचे सहा महिन्यांत पहिले पीक येते. रेशीमच्या अळ्यांना बाजारात पाचशे ते सहाशे रुपये किलोप्रमाणे बाजारभाव मिळतो.

Farmer Sakhahari Jadhav
4 महिन्यांपासून कोरे रेशनकार्ड नाही; अन्न पुरवठा विभागाचा गलथान कारभार

दर महिन्याला साधारण एक लाख ८० हजार उत्पन्न त्यांना मिळते. रेशीम पीक प्रयोगामुळे या वर्षी रेशीमला चांगला भाव असल्याने वर्षाला आठ ते नऊ लाखांचे विक्रमी उत्पन्न त्यांना मिळाले. काही दिवसांपूर्वी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते त्यांना आदर्श शेतकरी पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनाचा रेशीम संचानालयतर्फे रेशीमश्री पुरस्कारही मिळाला आहे. त्यांना या प्रयोगात कुटुंबही मदत करते.

Farmer Sakhahari Jadhav
Nashik : विकतच्या पुरणपोळीवर शहारात होतोय आमरस

तुती लागवडीसाठी त्यांनी जीवामृत, शेणखत, गांडूळ खताचा वापर केला. श्री. जाधव शेतकऱ्यांनाही याबाबत मार्गदर्शन करतात. बेलगाव कुऱ्हेचे आदर्श शिक्षक विष्णू बोराडे यांनी रेशीम शेतीसाठी त्यांना प्रोत्साहित केले आहे. त्यांना रेशीम संचालनालयचे सहसंचालक दिलीप हाके, महेंद्र ढवळे, नाशिक जिल्हा रेशीम तांत्रिक अधिकारी सारंग सोरते यांचे मार्गदर्शन लाभते.

"रेशीम उद्योगामुळे पैसे, मानसन्मान मिळाला. कुटुंबातील व्यक्तीही मदत करतात. मोठा मुलगा राहुल याने कोल्हापूर विद्यापीठात सेरी कल्चर डिप्लोमा केला असून, त्याचाही फायदा रेशीम उद्योग करताना होत आहे. शासनाच्या नियोजन आणि तज्ज्ञांचे योग्य मार्गर्शन घेत सहा वर्षांपासून रेशीम शेती करीत आहे. या शेतीला सर्वाधिक महत्त्व दिल्यास शेती यशस्वी होऊ शकते. उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा असला तरी रेशीम शेती जगून राहते. त्यामुळे भरघोस उत्पन्न मिळत आहे."

- सखाहरी ऊर्फ नाना जाधव, रेशीम उद्योजक शेतकरी, कृष्णनगर (ता. इगतपुरी )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com