..तर शासनाचे आदेश झुगारू! महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लबचा इशारा

restaurant
restaurantesakal

सिडको (नाशिक) : शासनाच्या (state-government) नियमावलीत रेस्टॉरंट (restaurant) चालकांची घोर निराशा झाल्याने महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लबच्या (maharashtra restaurant club) वतीने गोविंद नगरच्या दि नाशिक रेस्टॉरंट क्लस्टर येथे आंदोलन करण्यात आले. जवळपास सर्वच व्यावसायिकांना रात्री ८ वाजेपर्यंत वेळ वाढवून मिळाली असतांना रेस्टॉरंट व्यवसायासयातून वगळल्याने नव्या लॉकडाऊन (lockdown) नियमावलीचा निषेध व्यक्त करण्यासाठी नाशिक मधील रेस्टॉरंट व्यावसायिकांनी संघटित होऊन याबाबतीत निदर्शने करून आपली नाराजी व्यक्त केली.

..तर शासनाचे आदेश झुगारू!

येत्या 10 ऑगस्ट पर्यंत रेस्टॉरंट संदर्भात सकारात्मक निर्णय न झाल्यास आम्ही सर्व नियम झुगारून रात्री 10 पर्यंत आसन व्यवस्थेसह रेस्टॉरंट चालवून दरम्यानच्या काळात कुठलीही कारवाई अथवा दंड आकारल्यास याची स्वर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल असा इशारा महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लबचे संस्थापक वेदांशू पाटील यांनी दिला आहे. दरम्यान परवानगी न घेता आंदोलन केल्याने अंबड पोलिसांनी आंदोलकांवर कायदेशीर कारवाई केली आहे.

restaurant
नाशिकमध्ये भाजपमधील अंतर्गत वादावर तूर्त पडदा!

५० पेक्षा अधिक रेस्टॉरंट व्यावसायिकांचा सहभाग

मागील लॉकडाऊन असो अथवा आत्ताची गेली ४ महिने रेस्टॉरंट मालकांनी शासनाचे नियम पाळत आपल्या व्यवसायाची गाडी सुरु ठेवली होती. परंतु नव्या नियमावलीत झालेला दुजाभाव सहन न करण्याचा पवित्रा नाशिक मधील रेस्टॉरंट वाल्यांनी स्वीकारला आहे. रेस्टॉरंटला रात्री १० वाजेपर्यंतची वेळ वाढवून मिळावी, या प्रमुख मागणीसह आथिर्क पॅकेज साठीही सर्वच व्यावसायिक आग्रही आहेत. महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लबच्या वतीने प्रमुख मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच जिल्हा अधिकारी यांना पाठविण्यात आले आहे. या आंदोलनात नाशिक मधील सुमारे ५० पेक्षा अधिक रेस्टॉरंट व्यावसायिकांनी प्रत्यक्षपणे सहभाग नोंदवला. तर २०० पेक्षा अधिक रेस्टॉरंट चालक, मालकांनी या आंदोलनास पाठिंबा दिला होता. शासनाने विविध कर तसेच विज बिलात सूट द्यावी अशी मागणी कुलकर्णी पावभाजीचे संचालकांनी केली. तर हिंद केसरी हॉटेलचे निखिल पालवे यांनी त्वरित मागण्या मान्य न झाल्यास आत्महत्या हाच शेवटचा पर्याय असल्याचे म्हटले.

मुळात रेस्टॉरंट मध्ये बसून खाण्यासाठी सायंकाळी नागरिक बाहेर पडतात. अशात दुपारी ४ नंतर आसन व्यवस्थेवर निर्बंध लादल्याने नागरिकांची देखील मोठी गैरसोय होते. शिवाय रेस्टॉरंटला मोठ्या आर्थिक अडचणींचा फटका देखील बसत आहे.- वेदांशू पाटील, संस्थापक, महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लब (फोटो)

restaurant
सुरेश वाडकर म्हणतात, 11 वर्षांपासून मी वनवास भोगतोय..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com