Nashik Municipal Election | पंचवटी, नाशिक रोडला दोन प्रभागात वाढ

Nashik-Municipal-Election
Nashik-Municipal-Electionesakal

नाशिक : महापालिकेची सातवी पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रशासकीय तयारीचा भाग म्हणून मंगळवारी प्रारूप प्रभागरचना जाहीर करण्यात आली. त्यात नाशिक रोड व पंचवटी विभागात दोन प्रभाग वाढणार आहे.

नगरसेवकांची संख्या वाढणार...

प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर सहा विभागात कोणत्या प्रभागांचा समावेश होईल, याबाबतची उत्सुकतादेखील वाढली असली तरी निवडणुकीनंतर प्रभागांचा समावेश विभागात केला जाणार आहे. दरम्यान, पंचवटी व नाशिक रोड विभागात प्रत्येकी दोन प्रभाग वाढणार असल्याने नगरसेवकांची संख्या वाढून सर्वात मोठे प्रभाग राहतील.

Nashik-Municipal-Election
नाशिक महापालिकेची प्रभाग रचना जाहीर; इच्छुकांची कार्यालयात झुंबड

नाशिक रोड विभागात मागील पंचवार्षिकमध्ये सहा प्रभाग होते, आता आठ होतील. पश्‍चिम विभागात तीन प्रभाग होते, आता पाच राहतील. पूर्व विभागात सहाऐवजी आठ, सातपूर विभागात पाचऐवजी सहा, सिडको विभागात सहाऐवजी आठ प्रभाग होतील. पंचवटी विभागात सहाऐवजी आठ प्रभाग होतील. दरम्यान, निवडणुकीनंतर प्रशासकीय सोयीची बाब म्हणून प्रभागांचा समावेश विभागांमध्ये केला जाणार आहे. मागील पंचवार्षिकमध्ये मेनरोड, रविवार कारंजा हा भाग पश्‍चिम विभागाला प्रशासकीय सोईसाठी जोडण्यात आला होता.

Nashik-Municipal-Election
नाशिक महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com