जुलैपासून डास आढळणाऱ्या घरांना दंड; साथ रोग प्रतिबंधाची तयारी

mosquito
mosquitoesakal

नाशिक : पावसाळा (Monsoon) सुरू झाल्याने डास उत्पत्ती केंद्रात वाढ होऊन विविध साथरोग वाढण्याचा धोका असल्याने महापालिकेतर्फे (NMC) साथरोग प्रतिबंधाच्या उपाययोजनांना वेग आला आहे. डास (Mosquito) उत्पत्ती केंद्र आढळणाऱ्या घरांना नोटिसा देण्याचे काम जोरात सुरू आहे. जुलैपासून मात्र थेट दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी (NMC commissioner) दिल्या आहेत. (NMC Preparations for accompanying disease prevention Nashik News)

शहरात पावसाळ्याच्या तोंडावर डासांचा उच्छाद वाढून विविध साथ रोग पसरतात. पावसाळ्यात पाणी साचून टायर, नारळ करवंट्यासह पाण्याचे साठे असलेल्या नागरिकांना नोटिसा दिल्या जात आहे. जुलैपासून मात्र दंडात्मक कारवाई केली जाणार आहेत. शहरात महापालिकेचे ४२ गप्पी मासे पैदास केंद्र आहेत. या केंद्रावरून २० लाख लोकसंख्येच्या नाशिक शहरातील ५८ हजार ८७५ डास उत्पत्ती स्थानावर नियंत्रण ठेवण्याचे महापालिकेपुढे आव्हान आहे. आतापर्यंत २३१३ डास उत्पत्ती केंद्रावर गप्पी मासे सोडण्यात आले आहे, तर साधारण १७ हजार ५१६ डास उत्पत्ती केंद्रावर हंगामात डास सोडण्याचे नियोजन आहे.

दीड लाख घरांची तपासणी

एप्रिलपासून १ लाख ४६ हजार घरांची महापालिकेच्या पथकांनी तपासणी केली आहे. त्यातील २३५ घराजवळ डास आणि डासांची अळी असल्याचे आढळले आहे. तर पाचशेहून अधिक पाण्याच्या साठे असलेल्या ठिकाणी डास उत्पत्ती केंद्र आढळली. याप्रकरणी महापालिकेने ५८ नागरिकांना नोटिसा बजावल्या आहेत. तर १ हजाराहून अधिक ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. साथरोगांना आमंत्रण ठरणाऱ्या डास उत्पत्ती केंद्र असलेल्या ठिकाणच्या नागरिकांना नोटिसा देण्यात येत आहे. मात्र, वारंवार नोटिसा देऊनही दखल घेतली जात नसल्याने महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी अशा नागरिकांना दंडाच्या सूचना दिल्या आहेत. दंडात्मक कारवाईत पहिल्यांदा २०० रुपये त्यानंतर दुप्पट ४०० रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाईचे नियम आहे.

फौजदारी गुन्हा

घरात किंवा परिसरात डास उत्पत्ती केंद्र निर्माण होऊ न देणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. त्याबाबत नागरिकांनी जागरूक राहिले पाहिजे. मात्र डास उत्पत्ती केंद्रांबाबत निष्काळजीपणा दाखविला गेल्यास आणि त्या भागातील डास उत्पत्ती केंद्रातून कुठल्या साथ रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास संबंधित नागरिकावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची आपत्ती व साथ रोग नियंत्रण कायद्यात तरतूद आहे. प्रसंगी त्याचा वापर केला जाईल, असा इशारा जीवशास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी दिला आहे.

mosquito
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून बस सुरू करा हो...

विभाग, तपासलेले घर, डास सापडलेले घर, अळी सापडलेले पाणीसाठे, नोटिसा गप्पी मासे सोडले

नाशिक पूर्व २५०० ३७ ६१ २७ ००

नाशिक पश्चिम २४२५४ ४७ ७४ ०० ८७

सातपूर १९४६२ ३९ १०९ १४ ३९२

पंचवटी ३४३३३ ३९ ९९ ०० २००

ना. रोड ३१६८० ५१ ११९ ०३ ३३४

सिडको ३४२३९ २२ ३८ १४ ३०

एकूण १४६४६०८ २३५ ५०० ५८ १०४३

mosquito
मतदार याद्या प्रसिध्दीकडे लक्ष; अंतिम यादी 7 जुलैला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com