मविप्र वरिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश मेरिट फॉर्मची उद्यापर्यंत मुदत

Admissions process
Admissions processesakal

नाशिक : मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍थेच्‍या वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये विविध पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. केटीएचएम महाविद्यालय वगळता अन्‍य महाविद्यालयांत पदवीच्‍या प्रथम वर्षाच्‍या प्रवेशासाठी ऑनलाइन मेरिट फॉर्म भरावा लागणार आहे. त्‍यासाठी रविवार (ता.२६)पर्यंत मुदत असणार आहे. मविप्र संस्‍थेच्‍या वरिष्ठ महाविद्यालयांच्‍या प्रथम वर्ष पदवी वर्गाचे प्रवेश ऑनलाइन प्रक्रियेद्वारे होणार आहे. इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी https://mvperp.org या संकेतस्थळाला भेट देऊन मेरिट फॉर्म भरायचा आहे. केटीएचएम महाविद्यालयासाठी स्वतंत्ररीत्या प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. (other colleges will have to fill up an online merit form for admission to the first year of the degree in nashik)

Admissions process
विचारपूर्वक भरा...अकरावी प्रवेशाच्या अर्जाचा भाग दोन

अशी आहे पुढील प्रक्रिया

ऑनलाइन मेरिट फॉर्म भरण्यासाठी रविवार (ता. २६)पर्यंत मुदत आहे. यानंतर पहिली गुणवत्तायादी याच दिवशी दुपारी चारला प्रसिद्ध केली जाणार आहे. यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सोमवार (ता. २७) पासून बुधवार (ता. २९) पर्यंत मुदत असेल. दुसरी गुणवत्तायादी गुरुवारी (ता. ३०) सायंकाळी सहाला प्रसिद्ध केली जाणार आहे. यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १ व २ जुलैची मुदत आहे. तिसरी गुणवत्तायादी ४ जुलैला सायंकाळी सहाला प्रसिद्ध केली जाईल. या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ५ जुलैची मुदत असेल. रिक्‍त जागांवर प्रवेशासाठी पुढीलप्रक्रिया राबविली जाईल.

२१ महाविद्यालयांचा समावेश

या प्रक्रियेंतर्गत केटीएचएम महाविद्यालय वगळता अन्‍य सर्व वरिष्ठ महाविद्यालयांतील पदवीच्‍या प्रथम वर्षाला प्रवेश दिला जाणार आहे. नाशिक शहर व ग्रामीण भागातील तालुका पातळीवरील अशा एकूण २१ महाविद्यालयांसाठी ही प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे.

Admissions process
नाशिक : राज्यातील ITI मध्ये ऑनलाइन प्रवेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com