फी माफीसाठी पालकांकडून करण्यात आलेला रस्ता रोको

फी माफीसाठी पालकांचा रास्ता रोको
फी माफीसाठी पालकांचा रास्ता रोकोesakal

जुने नाशिक : JMCT इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी फी माफीसाठी आक्रमक होत रास्ता रोको केला. पोलिसांची मध्यस्ती आणि शाळा प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर चार तासाने आंदोलन मागे घेण्यात आले. १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात होणार आहे. त्यानिमित्त शाळेकडून विद्यार्थ्यांकडे गेल्या दोन वर्षापासून थकीत असलेली फीची मागणी केली जात आहे.

शनिवारी (ता. ४) यासंदर्भात शाळा प्रशासनाकडून पालकांची सकाळी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठक सुरू होण्यापूर्वीच शाळा प्रशासनाकडून ती भरण्यास सांगण्यात येऊन शैक्षणिक फी तीन हजारांनी वाढवण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामुळे पालक वर्गात संतापाची लाट पसरली.

कोरोनाकाळात शाळा सुरू नसतानादेखील संपूर्ण फीची मागणी केली जात आहे, याचा निषेध करण्यात आला. कोरोना काळातील दोन वर्षाची फी माफ करण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली. मागणीस घेऊन पालक आक्रमक झाले. त्यानंतर शाळा प्रशासनाने ५० टक्के फी माफी करण्याचे आश्वासन दिले, पालकांना मात्र ते मंजूर नव्हते. त्यांनी पूर्ण फी माफ करावी, यापुढे फी वाढू नये, अशी मागणी केल्याने शाळा प्रशासनाने विरोध केला. वाद निर्माण झाल्याने शेवटी पालकांनी रास्ता रोको केला. तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन सुरू होते. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली.

या वेळी पालकांनी शाळा प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी केली. तीनच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळताच मुंबई नाका पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पालकांचा आक्रमक पवित्र्यात बघता त्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पालक ऐकण्याच्या परिस्थितीत नसल्याने शेवटी शाळा प्रशासन आणि पालकांमध्ये मध्यस्थी करत बैठक घडवली.

फी माफीसाठी पालकांचा रास्ता रोको
Nashik : वरिष्ठ, निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणाचा फज्जा

मुख्याध्यापिका यांनी पालक अंगावर येत दमदाटी करत असल्याचे सांगितले. पालकांनी आरोप धुडकावून लावला. त्यानंतर शाळा प्रशासनाने शेवटी माघार घेत पालकांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी काही दिवसाची मागणी केली. मागण्यांसंदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन तोंडी न देता लेखी स्वरूपात देण्याची मागणी पालकांनी केली. शेवटी बैठकअंती पालकांना लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. शुक्रवारी (ता. १०) बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासनात नमूद करण्यात आले आहे.

फी माफीसाठी पालकांचा रास्ता रोको
पाठ्यपुस्तक रचना समितीचा कार्यकाळ समाप्त झाल्याने समिती बरखास्त; सी. एन. अश्वतनारायण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com