नाशिक : अरेबियन खजूरला पसंती; विविध प्रकारचे खजूर विक्रीसाठी दाखल

Arabian Dates
Arabian Datesesakal

जुने नाशिक : रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांसह अन्य नागरिकांकडून खजूरला मागणी वाढली आहे. अरबी (Arab) देशातून येणाऱ्या खजूरला अधिक पसंती मिळत आहे. ८० रुपयांपासून ६०० रुपये प्रति किलो विविध प्रकारची खजुराची विक्री होत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. खजूर (Dates) सेवन करण्यास धार्मिक आणि शास्त्रीय कारण आहे. निर्जल रोजा करताना शरीरातील थकवा नाहीसा करणे, यासाठी असलेले जीवनसत्त्व (Vitamin) यातून मिळते. पाण्याची कमी भरून काढण्याचे कामदेखील होत असते.

इतकेच नाही तर शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढविण्याचे महत्त्वाचे काम खजुराच्या माध्यमातून केले जाते. इस्लाम (Islam) धर्म प्रेषित हजरत महम्मद पैगंबर (Hazrat Muhammad the Prophet) यांच्याकडूनदेखील सहेरी आणि इफ्तारमध्ये खजुराचे सेवन केले जात. मुस्लिम बांधवांकडून अजूनही ती संस्कृती जपली जात आहे. त्यानिमित्ताने रमजानमध्ये (Ramzan Festival) सर्वात पहिला कल खजूर खरेदीकडे असतो. यांचादेखील विविध पंचवीस ते तीस प्रकारचे खजूर बाजारात विक्रीस दाखल झाले आहे. ८० ते ६०० रुपये प्रति किलो खजूर विक्री होत आहे.

Arabian Dates
नाशिक : गोदावरी एक्स्प्रेससाठी जनहित याचिका

असे आहेत प्रकार

आजवा, कलमी, इराण बॉम्ब, कियान, मरिअम, सुक्री अशा विविध प्रकारच्या खजुराचा समावेश आहे. या वर्षी महागाईमुळे दरांमध्ये वाढ झाली आहे. परंतु, कोरोनानंतर समाजातील आर्थिक परिस्थिती बघता जुन्या दरानेच माल विक्री केला जात आहे, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. यात अरबी देशातून येणाऱ्या खजूरला अधिक मागणी असल्याचेही सांगण्यात आले.

Arabian Dates
नाशिकला सराव करणाऱ्या यमुनाने पटकावले कांस्‍य

"आवक कमी असल्याने तसेच कमी महागाईमुळे मोठ्या व्यापाऱ्यांनी दरांमध्ये वाढ केली आहे. किरकोळ विक्रेत्यांना जुन्या दराने मालविक्री करावा लागत आहे. त्यामुळे नफ्याचे प्रमाण घटले आहे. अरबस्थानमधून येणाऱ्या खजूरला अधिक मागणी आहे."

- आयुब सय्यद, विक्रेता

मुख्य खजुराचे दर

खजूर दर प्रतिकिलो

मदिना ४०० ते ६००

रसगुल्ला २०० ते ३००

मरिअम २५० ते ३०

अंगुरी १५० ते २००

साधी ८० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com