काझी गढीचे मालक अवतरले; खासगी मिळकत असल्याचा फलक लावला

board
boardesakal

जुने नाशिक : काझी गढी संरक्षण भिंतीच्या कामात अडचणी वाढल्या आहेत. अनेक वर्षापासून संरक्षण भिंत बांधण्यावरून वाद सुरू आहे. त्यात आता खासगी मिळकत असल्याची ठिणगी पडली आहे. अचानक काहींनी गढीच्या काही भागावर मालकी हक्क सांगत त्या ठिकाणी खासगी मिळकत असल्याचा फलक लावला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनासह पोलिस प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. (Qazi Gadhi owner in nashik Placed a private property sign Nashik News)


अनेक वर्षापासून काझी गढी पावसाळ्यात थोड्या फार प्रमाणात ढासळत आहे. काही वर्षांपूर्वी तर गढी ढासळण्याची मोठी घटना घडली होती. काही घरी त्यात दबली होती. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. तेव्हापासून गढीस संरक्षण भिंत बांधण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. परंतु संरक्षण भिंत बांधायची कुणी यावरून वाद सुरू आहे. आता त्यात आणखी एका वादाची भर पडली आहे. गढीच्या सिटी सर्व्हे नंबर ५०१६ वरील एकूण समाई १५ हजार ८८४. ७० भागांपैकी ३ हजार ९७१ चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली जागा खासगी मिळकत असल्याचा दावा काहींनी केला. त्यानुसार त्या भागावर खासगी मालकीचा हक्क सांगणारा फलक लावण्यात येऊन संबंधित जागेस तारेचे कंपाउंड करण्यात आले आहे

board
नाशिक : नवीन गटरचनेमुळे 'कहीं खुशी-कहीं गम'; राजकीय उलथापालथ

त्यामुळे संरक्षण भिंत बांधण्याच्या कामात अडथळे येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खासगी मिळकत असल्याचे प्रशासनाकडून सांगत त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात टाळाटाळ केली जात होती. आता तर त्या ठिकाणी खासगी मालकी असल्याचा फलकच लागल्याने संरक्षण भिंत बांधण्याचे आणखी एक कारण प्रशासनास मिळाले आहे. संरक्षण भिंत बांधण्याची आशा यामुळे धूसर झाली आहे. दुसरीकडे जर ही जागा खासगी होती, तर यापूर्वीच कोणी त्यावर आपली मालकी का सांगितली नाही. इतक्या वर्षानंतर अचानक जागेची मालकी सांगणारे कसे प्रकट झाले, अशी चर्चा स्थानिकांमध्ये रंगली होती. येथील रहिवाशांनी याबाबत नाराजी व्यक्त करत महापालिका आणि जिल्हा प्रशासनाची चूक असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. रहिवाशांनी संरक्षण भिंत बांधण्याची केलेली मागणी महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण झाली असती, तर कदाचित आज या ठिकाणी वेगळे चित्र बघावयास मिळाले असते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

board
नाशिक : जीर्ण वृक्षांचे सर्वेक्षण करून तोडण्याची मागणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com