नाशिक : कठडे नसलेल्या फरशीवरून ट्रॅक्टर कोसळला नाल्यात

tractor accident
tractor accidentesakal

नामपूर (नाशिक) : येथील साक्री रस्त्यालगत आसरा हॉटेलजवळील फरशी पुलाला कठडे नसल्याने शुक्रवारी (ता. १) ट्रॅक्टर नाल्यात कोसळून भीषण अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकामी तातडीने लक्ष घालून नाल्यावरील फरशीला तातडीने कठडे बसवावे, अशी मागणी होत आहे.

शेतकरी ठेकेदारांच्या नावाने बोटे मोडतात

नामपूर- साक्री रस्त्याची खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. गेल्या वर्षीच रस्त्याचे कोट्यवधी रुपये खर्चून डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु, एका वर्षाच्या आतच रस्त्यावर पडलेल्या भगदाडामुळे कामाच्या गुणवत्तेवरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या उन्हाळ कांद्याचा हंगाम सुरू झाल्याने येथील बाजार समिती आवारात काटवन परिसरासह साक्री तालुक्यातून मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरद्वारे कांद्याची वाहतूक होत आहे. परंतु, रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शेतकरी ठेकेदारांच्या नावाने बोटे मोडतात. आसरा हॉटेलजवळ उतार असल्याने यापूर्वी अनेकवेळा लहान- मोठे अपघात झाले आहेत. दोन- अडीच वर्षांपूर्वी तेथे फरशीपुलाच्या रुंदीकरणाचे काम करण्यात आले आहे. परंतु, फरशीपुलाला कठडे नसल्याने अपघात झाल्यानंतर वाहने थेट नाल्यात जावून कोसळतात. यापूर्वी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसह अनेक दुचाकीस्वार नाल्यात कोसळल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे आसरा हॉटेलजवळील फरशीपुलाला कठडे बांधणे गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्याने विचार करून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी उपसरपंच कृष्णा अहिरे, सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत, धर्मराज सावंत, भाऊसाहेब सावंत, माधवराव सावंत आदींनी केली आहे.

tractor accident
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी भूसंपादनाचे दर ठरले...
tractor accident
...हा तर एप्रिल फूल करण्याचा प्रयत्न!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com