नाशिक : राष्ट्रीय घोषवाक्य स्पर्धेत वैभव अलई प्रथम

Vaibhav Alai
Vaibhav Alaiesakal

नाशिक : 2022 साली त्रिपुरा राज्याला राज्य दर्जा मिळवून 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्रिपुरा राज्य सरकारकडून राष्ट्रीय घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 1 जानेवारी 2022 ते 18 जानेवारी 2022 या कालावधी दरम्यान 'माय गव्हर्नमेंट' या शासकीय पोर्टलवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या घोषवाक्य स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील लोहोणेर येथील वैभव अलई यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

वैभव अलई यांनी तयार केलेले "राज्य दर्जा के पचास वर्ष, त्रिपुरी जनजाती का उत्कर्ष" हे घोषवाक्य स्पर्धेत अव्वल ठरले असून 5000 रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे प्रथम क्रमांकाच्या परितोषिकाचे स्वरूप असेल अशी माहिती त्रिपुरा राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ. नरेश बाबू यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Vaibhav Alai
मराठी भाषा गौरव दिन : सोशल मीडियावर लिहणाऱ्या तरुणांचे मनोगत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com