वऱ्हाडाची क्रुझर, एसटी, स्कुल बसला पसंती; ट्रॅक्टर, ट्रकवर कोणी बसेना

Wedding Party
Wedding Partyesakal

नरकोळ (जि. नाशिक) : कोरोनाकाळात ५० वऱ्हाडींच्या उपस्थितीत विवाह पार पडत होते. कोरोना निर्बंध उठताच विवाह जोमाने सुरु झाले. काळानुसार विवाह (Weddings) हायटेक झाले आहेत. आधुनिक काळानुसार आमुलाग्र बदल होत असताना आता वऱ्हाडी मंडळी एसटी, स्कुल बस, क्रुझर, नवनवीन गाड्यांना पसंती देत आहेत. जुन्या पारंपारिक ट्रक, ट्रॅक्टरवर कोणीही बसेना. यामुळे वऱ्हाडींना नेतांना वरपित्याची वाहनांच्या खर्चासाठी चांगलीच दमछाक होत आहे. (wedding parties prefer cruiser ST school bus Over truck and tractors Nashik news)

विवाह समारंभात दिवसेंदिवस मोठा बदल पाहण्यास मिळत असून, पारंपारिक जून्या वाहनांवर बसण्यास वऱ्हाडी नापंसती देत आहेत. पूर्वी लग्न समारंभासाठी बैलगाडीचा उपयोग होत. रात्री किंवा पहाटे भाऊबंदकी बैलगाडीने वऱ्हाडी वधु- पित्याच्या गावी जात. गावापासून दूर अंतरावर गाव असेल तर मुक्कामीची व्यवस्था असे. हळूहळू ने- आणसाठी ट्रक, ट्रॅक्टरची सोय झाली. बैलगाडी मागे पडली. गावातल्या ग्रामदैवतजवळ सर्व वऱ्हाडी एकत्र जमून वाहनावर जात. वधुपित्याच्या गावातील सर्व विधी आटोपल्यानंतरच सायंकाळी वर- वधुसोबतच वऱ्हाडी येत. आता नवरदेवाची सजविलेली गाडी वेगळी, वराची आईसह चुलत्या (वरमाई) यांची वेगळी गाडी तर वऱ्हाडीसाठी एस. टी., क्रुझर, स्कुल बस गाड्यांना पसंती असते. या वाहतुकीसाठी शाळांना सुट्ट्या असल्यामुळे स्कुल बस उपलब्ध होत आहेत. यामुळे स्कुल बस मालकाचा व्यवसाय तेजीत आहे.

Wedding Party
नाशिक : शनिवारी पाणी पुरवठा बंद

असे आहेत वाहतुकीचे दर
(२५ ते ४० कि. मी. पर्यंत)
ट्रक- ६ हजार रुपये
क्रुझर- ३ हजार
स्कुल बस- पाच हजार
चारचाकी- अडीच हजार

Wedding Party
घनकचरा व्यवस्थापन विभाग ॲक्शन मूडमध्ये; दंडात्मक कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com