नाशिक : गांधी तलावात 16 वर्षीय मुलगा बुडाला

young boy Death by drowning in a lake
young boy Death by drowning in a lakeesakal

म्हसरूळ (नाशिक) : रामकुंडातील गांधी तलावात पाेहण्यासाठी गेलेले तीन लहान मुले बुडाल्याची घटना रविवारी (ता. १७) सायंकाळच्या सुमारास घडली. यात १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला असून, जीवरक्षकांच्या प्रसंगावधनामुळे अन्य दाेघांचा जीव वाचला आहे. हसनेन उमर शेख (रा. विधातेमळा, मुंबई नाका) असे मृत मुलाचे नाव आहे. तर सुनील विनाेद परदेशी (१५, रा. कालिका नगर झाेपडपट्टी, मुंबई नाका) याला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

मुंबई नाक्याजवळील कालिका नगरमधील हसनेन, सुनील आणि त्यांचा एक मित्र असे तिघे जण रविवारी सायंकाळी चार ते साडे चारच्या सुमारास रामकुंडावर पाेहण्यासाठी आले हाेते. गांधी तलावात पोहताना तिघांना दम लागल्याने ते बुडू लागल्याचे जीवरक्षकांच्या लक्षात आले. यावेळी काही जीवरक्षकांनी पाण्यात उड्या घेत दाेघांना वाचविले. मात्र, हसनेन पाण्यात बुडाल्याने त्याला वाचविता आले नाही. काही वेळाने हसनेनचा शाेध लागला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले व डाॅ. बाेरा यांनी तपासून त्याला मृत घाेषित केले. ऐन रमजानसारख्या सणाच्या काळात या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. याप्रकरणी पंचवटी पाेलिस ठाण्यात घटनेची नाेंद करण्यात आली असून, तिसऱ्या मुलाचे नाव समजू शकले नाही. दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत जीवरक्षक दलाच्या तरुणांनी बुडालेल्या मुलांना बाहेर काढले होते. यावेळी रामकुंडावरील अमित धारगे, दीपक जगताप, सुनील बोरसे, शंकर माळी, शिवा बोरसे, शिवा वाघमारे, गणेश भोंड, सुरज, सोपान आदी जीवरक्षक मुलांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरले होते.

young boy Death by drowning in a lake
नाशिक : नागरिकांनो, स्वच्छ सर्वेक्षणासाठी प्रतिसाद नोंदवा
young boy Death by drowning in a lake
नागपूर : ओबीसी सदस्यांची माहिती शासनाकडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com