थकबाकीमुक्तीसाठी महावितरणची "नवप्रकाश'

थकबाकीमुक्तीसाठी महावितरणची "नवप्रकाश'

नाशिक - कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी महावितरणने "नवप्रकाश' योजना सुरू केली आहे. नाशिक परिमंडळातील तीन लाखांहून अधिक वीजग्राहकांना या योजनेत थकबाकीमुक्तीसोबतच नवीन वीजजोडणी घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
31 मार्च 2016 पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या उच्च व लघुदाब वीजग्राहकांसाठी महावितरणने 1 नोव्हेंबरपासून "नवप्रकाश' योजना सुरू केली आहे. नगर मंडळात एक लाख 72 हजार 185 वीजग्राहकांकडे 77 कोटी 94 लाखांची मूळ थकबाकी, 10 कोटी 48 लाखांचे व्याज, तसेच विलंब शुल्कापोटी एक कोटी 52 लाखांची थकबाकी आहे. नाशिक परिमंडळांत एकूण तीन लाख 10 हजार ग्राहकांकडे 158 कोटी 80 लाखांची मूळ थकबाकी, 22 कोटी 71 लाखांचे व्याज, तसेच विलंब शुल्कापोटी 3 कोटी 9 लाखांची थकबाकी आहे.
- मुख्य अभियंता, नाशिक परिमंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com